वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींचा उद्या देशव्यापी संप

By admin | Published: December 15, 2015 02:22 AM2015-12-15T02:22:47+5:302015-12-15T02:22:47+5:30

औषध धोरणात बदल करून औषधांच्या किंमती कमी करण्याची मागणी करत अखिल भारतीय वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी संघटनेने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात बुधवारी देशव्यापी

Medical and sales representatives tomorrow nationwide | वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींचा उद्या देशव्यापी संप

वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींचा उद्या देशव्यापी संप

Next

मुंबई : औषध धोरणात बदल करून औषधांच्या किंमती कमी करण्याची मागणी करत अखिल भारतीय वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी संघटनेने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात बुधवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. उत्पादनाच्या किंमतीवर आधारीत सर्व व अत्यावश्यक औषधांच्या किंमती कमी करून दर नियंत्रित ठेवण्याचे आवाहनही संघटनेने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
शासन औषधांच्या एमआरपीवर अबकारी कर लावण्याऐवजी ती औषधांच्या उत्पादन किंमतीवर लावावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. त्यामुळे औषधे दिवसेंदिवस अधिक महाग होत असून लवकरच सर्वसामान्यांनाही औषधे खरेदी करता येणार नाही. त्यामुळे सरकारने धोरणात बदल करून सार्वजनिक क्षेत्रातील औषध उत्पादन करणाऱ्या व लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या संपाचा औषध विक्रीवर परिणाम होणार नसला तरी, नव्या औषधाची माहिती डॉक्टरांपर्यंत पोहचणार नाही, असेही संघटनेतर्फे सांगण्यात आले.

Web Title: Medical and sales representatives tomorrow nationwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.