मेडिकल सीईटी ७ मे रोजी; निगेटिव्ह मार्किंग पद्धत रद्द

By Admin | Published: January 12, 2015 03:37 AM2015-01-12T03:37:26+5:302015-01-12T03:37:26+5:30

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी-२०१५) ७ मे रोजी घेण्यात येणार आहे.

Medical CET on May 7; Negative Marking Method Cancellation | मेडिकल सीईटी ७ मे रोजी; निगेटिव्ह मार्किंग पद्धत रद्द

मेडिकल सीईटी ७ मे रोजी; निगेटिव्ह मार्किंग पद्धत रद्द

googlenewsNext

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी-२०१५) ७ मे रोजी घेण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये ही परीक्षा घेणार असून, यंदापासून निगेटिव्ह मार्किंग पद्धत रद्द केल्याने विद्यार्थ्यांना विना टेन्शन परीक्षा देता येणार आहे.
एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.यू.एम.एस., बी.पी.टीएच., बी.ओ.टीएच., बी.ए.एस.एल.पी., बी.पी.अँड ओ. आणि बी.एस्सी नर्सिंग या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. परीक्षेचा अभ्यासक्रम गेल्या वर्षीप्रमाणेच आहे. तर एकूण पेपर ७२0 गुणांचा असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय असणार आहेत. या परीक्षेत संचालनालयाने मूलगामी बदल करून निगेटिव्ह मार्किंग पद्धत रद्द केली असल्याने विद्यार्थ्यांना ही परीक्षा विना टेन्शन देता येईल.(प्रतिनिधी)

Web Title: Medical CET on May 7; Negative Marking Method Cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.