मेडिकल कॉलेजला डॉ. आंबेडकरांचे नाव
By admin | Published: April 15, 2016 02:14 AM2016-04-15T02:14:35+5:302016-04-15T02:14:35+5:30
‘गोंदिया जिल्हावासीयांना दिलेला शब्द पाळत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले. एवढेच नाही, तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील वचननाम्यात जाहीर केल्याप्रमाणे
गोंदिया : ‘गोंदिया जिल्हावासीयांना दिलेला शब्द पाळत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले. एवढेच नाही, तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील वचननाम्यात जाहीर केल्याप्रमाणे कॉलेजला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचेही वचन सर्वांसमक्ष पूर्ण करीत आहोत. हे नाव बदलण्याची हिंमत कोणी करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिला. ‘भाजपा सरकारला बाबासाहेबांचे नाव नको आहे, म्हणूनच त्यांच्याकडून हे महाविद्यालय सुरू करण्यासाठीही विलंब केला जात आहे. मी केंद्राकडून महाविद्यालयासाठी १५० कोटी मिळवून दिले. ते पैसे कुठे गायब झाले,’ असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)