प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज
By admin | Published: March 31, 2016 03:40 AM2016-03-31T03:40:32+5:302016-03-31T03:40:32+5:30
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर उभारण्याचा विचार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर उभारण्याचा विचार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालय २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही तावडे यांनी गोपाल अग्रवाल यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना
दिले. (विशेष प्रतिनिधी)
सरकारी दरानेच होणार उपचार
गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी
मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडियाची परवानगी मिळावी
म्हणून आवश्यक ते निकष राज्य शासन तातडीने पूर्ण करेल, असे तावडे यांनी सांगितले.
पीपीपी मॉडेलनुसार उभारण्यात येणाऱ्या महाविद्यालय-इस्पितळांमध्ये सरकारी दरानेच उपचार केले जातील, असे तावडे यांनी स्पष्ट केले. तथापि, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पीपीपी मॉडेलवर ही महाविद्यालये उभारण्यास तीव्र विरोध दर्शविला. तसे करणे हे एक प्रकारचे खासगीकरणच असेल, असा इशारा त्यांनी दिला.