वैद्यकीय क्षेत्रातील करिअर

By Admin | Published: June 14, 2017 02:37 AM2017-06-14T02:37:59+5:302017-06-14T02:37:59+5:30

वैद्यकीय क्षेत्रातील करिअर म्हटले की उपचार करणारे डॉक्टर आणि नर्स एवढेच आपल्याला माहीत असते, पण त्यापलीकडे रुग्णालय व रुग्ण सेवेशी निगडित कितीतरी

Medical field careers | वैद्यकीय क्षेत्रातील करिअर

वैद्यकीय क्षेत्रातील करिअर

googlenewsNext

- डॉ. अमोल अन्नदाते

वैद्यकीय क्षेत्रातील करिअर म्हटले की उपचार करणारे डॉक्टर आणि नर्स एवढेच आपल्याला माहीत असते, पण त्यापलीकडे रुग्णालय व रुग्ण सेवेशी निगडित कितीतरी यंत्रणा कार्यरत असतात. विज्ञान क्षेत्रातील या विविध संधींचे विस्तीर्ण आकाश विद्यार्थ्यांना खुणावत आहे. फक्त त्याची माहिती करून घेणे गरजेचे आहे. 

वैद्यकीय क्षेत्रातील करिअरची पहिली पायरी म्हणजे दहावीनंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेणे. यातील सर्वोच्च संधी म्हणजे एम.बी.बी.एस. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश. मागच्या वर्षीपर्यंत यासाठी राज्य पातळीवर प्रवेश परीक्षेतून एम.बी.बी.एस.चे प्रवेश होत; पण या वर्षीपासून मात्र राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ‘नीट’च्या माध्यमातून सर्व प्रवेश होतात. खरेतर, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आता फार्मसी सोडले तर इतर सर्व प्रवेश हे नीटच्या माध्यमातूनच होतात. पण अनेकांना हे माहीत नसल्याने चांगल्या करिअर संधींना मुकावे लागते.
‘एम.बी.बी.एस.’साठीही शासकीय व खाजगी, अभिमत विद्यापीठे असे दोन पर्याय उपलब्ध आहेत; व या वर्षी हे सर्व प्रवेशही नीटच्या माध्यमातून झाले. या एम.बी.बी.एस.साठी भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे नामांकित एम्स या दिल्लीतील संस्थेची वेगळी प्रवेश परीक्षाही दरवर्षी देता येते. भारताबाहेर रशिया, चायना, फिलिपाइन्स या देशांमध्येही एम.डी. किंवा एम.बी.बी.एस.ला प्रवेश घेता येतो. पण तो घेताना दोन मुद्द्यांची माहिती पालक व विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. तेथून डीग्री घेऊन आल्यावर भारतात ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ (एम.सी.आय.) स्क्रीनिंग परीक्षा पास झाल्याशिवाय भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करता येत नाही. तसेच या देशांमध्ये अनुभव कमी मिळत असल्याने भारतात आल्यावर एक ते दोन वर्षे चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात अनुभव घेतल्याशिवाय वैद्यकीय प्रॅक्टिस किंवा करिअरला सुरुवात करू नये. एम.बी.बी.एस.शिवाय आयुर्वेद - बी.ए.एम.एस., होमिओपॅथी - बी.एच.एम.एस., युनानी - बी.यू.एम.एस. आणि सिद्धा अशा इतर अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेता येतो. येणाऱ्या काळात अ‍ॅलोपॅथी सोडून आयुर्वेद व होमिओपॅथीबद्दलही जागरूकता व रुग्णांची स्वीकार्हर्ता वाढली असल्याने या क्षेत्रातील करिअरमध्ये उज्ज्वल भवितव्य आहे. या सर्व अभ्यासक्रमांशिवाय बी.डी.एस. म्हणजे दंत रोग चिकित्सेसाठी प्रवेश घेतला जाऊ शकतो.
या माध्यमातून डॉक्टर होण्याचे मार्ग खुले असले तरी तितकीच मागणी असलेले नर्सिंग क्षेत्र त्या मानाने दुर्लक्षित राहिले आहे; व या क्षेत्रातील उत्तम संधींबद्दल अजून जागरूकता नाही. नर्सिंगमध्ये ए.एन.एम., जी.एन.एम. व बीएस्सी नर्सिंग असे तीन अभ्यासक्रम आहेत. यात ए.एन.एम., जी.एन.एम. हे मराठीत व सर्व शाखांसाठी तर बीएस्सी नर्र्सिंग हा इंग्रजीमध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. या तीनपैकी बीएस्सी नर्सिंग कोर्सला जास्त मागणी आहे. शक्यतो नर्सिंग करायचे असल्यास हाच कोर्स निवडलेला बरा. या अभ्यासक्रमानंतर पुढे एमएस्सी नार्सिंगही करता येते. यानंतर मोठ्या रुग्णालयात नर्सिंग क्षेत्रात तसेच नर्सिंग कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून उत्तम करिअर संधी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात अजूनही अशा नर्सिंग स्टाफचा मोठा तुटवडा आहे.
नर्सिंग क्षेत्राशिवाय फिजीओथेरपी व आॅक्यूपेशनल थेरपी हे दोन अभ्यासक्रम बारावीनंतर करता येऊ शकतात. फिजीओथेरपीमध्ये व्यायामाच्या व वैज्ञानिक अंग हालचालींच्या माध्यमातून स्नायू व हाडांशी निगडित समस्या सोडवता येतात व बरेच आजार फक्त फिजीओथेरपीच्या माध्यमातून बरे होऊ शकतात. आॅक्यूपेशनल थेरपीमध्ये अपंग तसेच शारीरिक त्रास असणाऱ्यांना त्यांचे काम नीट करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले जाते. फिजीओथेरपिस्टची खेळांमध्ये खूप गरज असते. प्रत्येक राष्ट्रीय संघाबरोबर किंवा खेळल्या जाणाऱ्या सामन्यांसाठी फिजीओथेरपिस्टची नेमणूक अनिवार्य असते. याशिवाय फार्मसीमध्ये डिप्लोमा व बॅचलर असे दोन कोर्स उपलब्ध आहेत. डी.फार्म केल्यास स्वत:चे मेडिकलचे दुकान उघडता येते आणि फार्मसी कंपनीत किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज् म्हणूनही काम करता येते. बी.फार्म केल्यास फार्मसी महाविद्यालयात अध्यापनाचे किंवा हर्म्सी क्षेत्रात संशोधनाचे काम करता येते.

एम.बी.बी.एस.शिवाय आयुर्वेद - बी.ए.एम.एस., होमिओपॅथी - बी.एच.एम.एस., युनानी - बी.यू.एम.एस. आणि सिद्धा अशा इतर अभ्यासक्रमांनाही प्रवेश
घेता येतो.
येणाऱ्या काळात अ‍ॅलोपॅथी सोडून आयुर्वेद व होमिओपॅथीबद्दलही जागरूकता व रुग्णांची स्वीकार्हर्ता वाढली असल्याने या क्षेत्रातील करिअरमध्ये उज्ज्वल भवितव्य आहे.
या सर्व अभ्यासक्रमांशिवाय बी.डी.एस. म्हणजे दंत रोग चिकित्सेसाठी प्रवेश घेतला
जाऊ शकतो.

Web Title: Medical field careers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.