मेडिकल क्षेत्रात डॉ. मुफ्फझल लकडावाला यांचा लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने गौरव

By admin | Published: April 11, 2017 08:35 PM2017-04-11T20:35:48+5:302017-04-11T23:01:03+5:30

५०० किलो वजनाची जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमदवर उपचारासाठी पुढाकार घेणारे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांना मेडिकल विभागातील लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने गौरवण्यात आले आहे

In the medical field Dr. Mumfazal Lakdawala's fame, "Maharashtrian of the Year" | मेडिकल क्षेत्रात डॉ. मुफ्फझल लकडावाला यांचा लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने गौरव

मेडिकल क्षेत्रात डॉ. मुफ्फझल लकडावाला यांचा लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने गौरव

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 - ५०० किलो वजनाची जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमदवर उपचारासाठी पुढाकार घेणारे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांना मेडिकल विभागातील लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. "दिग्गज नावांच्या शर्यतीत मी पुरस्कार जिंकणं ही अभिमानाची गोष्ट", अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. लकडावाला यांनी व्यक्त केली. 
 
मेडिकल विभागात डॉ. सदानंद सरदेशमुख (डीएसएसी, एव्हीपी, पीएच.डी), डॉ. आनंद देवधर(सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद), डॉ. सुलतान प्रधान (एम एस, एमबीबीएस, एफआरसीएस, एफएसीएस, एफसीपीएस), डॉ. तात्याराव लहाने (एम.बी.बी.एस., एम.एस. ऑप्थॉल्मॉलॉजी) यांचाही नामांकन यादीत समावेश होता. पण वाचकांनी डॉ. मुफ्फझल लकडावाला यांना भरघोष मतं दिल्यानं त्यांचं या पुरस्कारावर नाव कोरले गेले. 
 
मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
 
facebook.com/lokmat
 
डॉ. मुफ्फझल लकडावाला यांची माहिती
५०० किलो वजनाची जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमदवर उपचारासाठी पुढाकार घेतल्याने जगभर वेगळी ओळख. अतिस्थूलतेने ग्रासलेल्या जगभरातील रुग्णांचे आशास्थान बनलेले डॉक्टर. शांत, हसतमुख चेह-याचे डॉ. मुफ्फझल लकडावाला अनेक लठ्ठ व्यक्तींसाठी देवदूत ठरतात. जगातील सर्वांत वजनदार असणा-या ५०० किलो वजनाच्या इमान अहमदचे वजन कमी करण्यासाठी त्यांनी मुंबईतील सैफी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू केले. इमानला एलिफंटासिस रोग झाला असल्यामुळे तिचे वजन वाढत गेले आणि अन्य आजार तिला जडले. जगात कोणत्याही डॉक्टरने इमानवर यशस्वी उपचार केले नाहीत, पण इमानवर उपचार करण्यासाठी डॉ. लकडावाला यांनी तिला मुंबईला आणले. डॉ. लकडावाला यांचा जन्म मुंबईत झाला असून, मास्टर्सपर्यंतचे शिक्षण त्यांनी मुंबईतच पूर्ण केले आहे. गॅरंट मेडिकल महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी नायर वैद्यकीय महाविद्यालयातून मास्टर्स इन सर्जरीचे (एमएस) शिक्षण पूर्ण केले. मुंबईतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर, २००४ मध्ये त्यांनी कोरियात प्रो. सिऑन हान कीम यांच्याकडून लेप्रोस्कोपीक कोलोरॅक्टल सर्जरीचे प्रशिक्षण घेतले. २००५ मध्ये बेल्जियम युनिर्व्हसिटी ऑफ घेंट हॉस्पिटलमध्ये डॉ. पीट पॅटयन यांच्याकडून गॅस्ट्रो सर्जरी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर, २००६ मध्ये त्यांनी युनायटेड स्टेट्स मधून बेरिअॅट्रिक सर्जरीचे शिक्षण घेतले. मुंबईत त्यांनी ‘सेंटर फॉर ओबेसिटी अँड डायजेस्टिव सर्जरी’ची सुरुवात केली. सैफी रुग्णालयात मिनिमल एक्सेस आणि बेरिअॅट्रिक सर्जरी विभागाचे ते अध्यक्ष आहेत. युनायटेड स्टेट्समधील सर्जिकल रिव्ह्यू कॉर्पोरेशन (एसआरसी) तर्फे जागतिक पातळीवरील उत्तम सेंटर म्हणून डॉ. लकडावाला यांना गौरविण्यात आले. २००७ मध्ये त्यांना ऑल इंडिया ह्युमन राइट्स असोसिएशनतर्फे ‘ह्युमिनिट्रीएन ऑफ द ईअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९९६ मध्ये त्यांना शिरीन मेहताजी ऑरशन तर्फे ‘ऑबस्ट्रक्टिव्ह जॉडिंस’साठी रौप्य पदक बहाल करण्यात आले होते.
 
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
 
lmoty.lokmat.com
 
 

Web Title: In the medical field Dr. Mumfazal Lakdawala's fame, "Maharashtrian of the Year"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.