आज रात्री १२पर्यंत मेडिकल दुकाने बंद

By admin | Published: October 14, 2015 03:53 AM2015-10-14T03:53:11+5:302015-10-14T03:53:11+5:30

अनधिकृत आॅनलाइन औषध विक्री करणाऱ्यांविरोधात सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ देशातील ८ लाख केमिस्टनी रात्री १२ वाजल्यापासून संप पुकारला आहे.

Medical shops closed till 12 o'clock tonight | आज रात्री १२पर्यंत मेडिकल दुकाने बंद

आज रात्री १२पर्यंत मेडिकल दुकाने बंद

Next

मुंबई : अनधिकृत आॅनलाइन औषध विक्री करणाऱ्यांविरोधात सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ देशातील ८ लाख केमिस्टनी रात्री १२ वाजल्यापासून संप पुकारला आहे.
बुधवारी रात्री १२पर्यंत औषधांची दुकाने बंद ठेवणार असल्याची माहिती आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टतर्फे देण्यात आली. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत. अनेक औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकण्यास केमिस्टवर एकीकडे बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे हीच औषधे आॅनलाइन आॅर्डर केल्यास सररास घरी पाठवली जातात. त्यामुळे याविरोधात सरकारने कारवाई करावी, अशी असोसिएशनची मागणी आहे. देशातील ८ लाख, राज्यातील ५५ हजार आणि मुंबईतील सुमारे ३ हजार केमिस्ट संपात सहभागी होणार आहेत, असे असोसिएशनचे सरचिटणीस सुरेश गुुप्ता यांनी सांगितले. रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.
खासगी, निमशासकीय, शासकीय रुग्णालयात, डॉक्टरांकडे पुरेसा औषधसाठा ठेवण्यास सांगितला आहे. प्रशासनाने मुख्य कार्यालयात खास कक्ष स्थापन केला आहे. औषधांची गरज भासल्यास १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक आहे. त्याचबरोबरीने ०२२-२६५९२३६२, २६५९२३६३, २६५९२३६४, २६५९२३६५ या क्रमांकांवरही संपर्क साधू शकता, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ांि.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर २४ तास सेवा देणाऱ्या औषध विक्रेत्यांची यादी उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Medical shops closed till 12 o'clock tonight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.