डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त
By admin | Published: December 31, 2015 04:21 AM2015-12-31T04:21:19+5:302015-12-31T04:21:19+5:30
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.
Next
मुंबई : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.
किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना उपचारार्थ लागणाऱ्या १३ जेनरिक औषधे तसेच उपकरणांना विविध करांतून मुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून डायलिसीस संदर्भातील औषधांची आणि उपकरणांची यादी विक्रीकर विभागाकडून मागविण्यात आली होती. यावर विक्रीकर विभागाने पडताळणी करून ही यादी तयार केली. (विशेष प्रतिनिधी)