पिंपरीच्या आरटीओ कार्यालयातील 'मी टू'चे प्रकरण चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 10:10 PM2018-10-19T22:10:31+5:302018-10-19T22:15:02+5:30

पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने सहकारी महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

mee too in RTO office of Pimpri | पिंपरीच्या आरटीओ कार्यालयातील 'मी टू'चे प्रकरण चव्हाट्यावर

पिंपरीच्या आरटीओ कार्यालयातील 'मी टू'चे प्रकरण चव्हाट्यावर

Next
ठळक मुद्देविविध कार्यालयांमध्ये विशाखा समिती कुचकामी हे स्पष्ट देशभर चर्चेत असलेले 'मी टू'चे वादळ आता पिंपरी चिंचवडला पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने सहकारी महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देशभर चर्चेत असलेले 'मी टू'चे वादळ आता पिंपरी चिंचवडला धडकले आहे. सुबोध मेडशिकर असे 'मी टू' प्रकरणात अडकलेल्या आरटीओ अधिकाऱ्याचे नाव आहे. 
पोलिसांनी  दिलेल्या महितीनुसार,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर काम करत असलेल्या मेडशीकर याने कार्यालयात काम करीत असलेल्या महिलेचा विनयभंग केला. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. काम करीत असताना, तिच्या अवती भोवती थांबणे, जेवणासाठी बरोबर येण्याचा आग्रह करणे, अशा प्रकारे तो पाठलाग करीत होता. वॉशरूमला जात असताना तिला, ''तुझे करिअर संपून टाकेन असे धमकावले.  मे २०१७ ते ७जून २०१८ पर्यंत हा प्रकार सुरू होता. या त्रासाला वैतागून अखेर महिलेने कार्यालयातील विशाखा समितीकडे तक्रार नोंदवली. दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने दिलेला अहवाल फिर्यादी महिलेला मिळाला नाही. आरोपीवर काहीच कारवाई होत नसल्याने या अहवालात आरोपीला क्लीन चिट दिल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे पीडित महिला थेट पोलीस ठाण्यात गेली. पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल झाली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अद्याप अटक झालेली नाही. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 
.........................
विशाखा समिती कुचकामी
शासनाच्या आदेशानुसार विविध कार्यालयांमध्ये 'विशाखा' समिती स्थापन झाल्या. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी स्थापन झालेल्या समित्या महिलांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: mee too in RTO office of Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.