फडणविसांचे संघाला साकडे

By admin | Published: October 30, 2015 12:55 AM2015-10-30T00:55:56+5:302015-10-30T00:55:56+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वच्छ प्रतिमा हा महापालिका निवडणुकीचा मुद्दा केला आहे. बुधवारच्या कल्याण-डोंबिवलीतील सभेत शिवसेनेवर आक्रमकपणे टीकास्त्र सोडतानाच

Meet the Fadnavis team | फडणविसांचे संघाला साकडे

फडणविसांचे संघाला साकडे

Next

अनिकेत घमंडी, डोंबिवली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वच्छ प्रतिमा हा महापालिका निवडणुकीचा मुद्दा केला आहे. बुधवारच्या कल्याण-डोंबिवलीतील सभेत शिवसेनेवर आक्रमकपणे टीकास्त्र सोडतानाच उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रतिमेकडे पाहून
मतदान करण्याचे साकडे घातले.
आपण स्वत: स्वयंसेवक, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्याचे सांगत संघ स्वयंसेवकांना मागील निवडणुकीत केला तसा दगाफटका न करण्याची आर्त साद फडणविसांनी घातली. मुख्यमंत्र्यांनी भर सभेत स्वयंसेवक कसा असतो, हे सांगताना राष्ट्रभक्ती, बलिदान, त्याग आणि स्वच्छ-पारदर्शी कारभार या चतु:सूत्रीचा पुनरुच्चार केला. अर्थात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बोलण्याचा संघ कार्यकर्त्यांवर किती परिणाम होईल व त्यांची नाराजी किती दूर होईल, ते मतदानाच्या दिवशी कळेलच. तसेच निकालाच्या दिवशी ते स्पष्ट होईल.

Web Title: Meet the Fadnavis team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.