समान नागरी कायद्याविरोधात सभा

By admin | Published: November 3, 2016 03:27 AM2016-11-03T03:27:37+5:302016-11-03T03:27:37+5:30

समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकार प्रयत्नशील आहे.

Meeting against common civil law | समान नागरी कायद्याविरोधात सभा

समान नागरी कायद्याविरोधात सभा

Next


कल्याण : समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. भाजपा सरकार मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करत आहे. मुस्लिमांवर कायदा लादण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी गुरुवारी सायंकाळी गोविंदवाडी येथील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मैदानावर सभा होणार आहे. तलाकच्या मुद्द्यातील सरकारी हस्तक्षेपालाही यात विरोध केला जाणार आहे.
मुस्लिम संघटनांतील उच्च विद्याविभूषित, धर्मगुरू तसेच नागरिक त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. साधारणत: १० हजारांपेक्षा जास्त व्यक्ती हजर राहतील, असा अंदाज या सभेसाठी पुढाकार घेणारे नगरसेवक कासीफ तानकी यांनी व्यक्त केला.
जमीयते उलेमा यांच्यातर्फे ही सभा होईल. या आयोजनासाठी कल्याणमधील मजलिसे मुशावरी मस्जीदे औकाफ यांचा प्रमुख सहभाग राहणार आहे. कल्याणमधील सर्व मशिदी ज्या संघटनेच्या अंतर्गत येतात, त्या मजलिसे मुशावरी मस्जीदे औकाफने मुस्लिम बांधवांना मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती मुफ्ती फुरकान मुक्री यांनी दिली.
या सभेला सात मुफ्ती संबोधित करतील. समाजाचे कार्यकर्ते शरफुद्दीन कर्ते हे देखील यावेळी उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>तलाकबाबत जागृती
मुस्लिमांच्या मते त्यांच्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ आहे. त्यात सरकारला हस्तक्षेप करण्याची गरज नाही.
तलाकसंदर्भात सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात देशभरात मुस्लिम महिलांचे स्वाक्षरी अभियान सुरू आहे.

Web Title: Meeting against common civil law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.