मुरलीमनोहर जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट
By Admin | Published: April 22, 2017 10:28 PM2017-04-22T22:28:54+5:302017-04-22T22:28:54+5:30
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 22 - भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. बाबरी मशीद प्रकरणात लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह भाजप व संघ परिवाराशी संबंधित एकूण १३ नेत्यांविरुद्ध कट कारस्थान रचल्याचा आरोप ठेवून खटला चालविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला होता. या पार्श्वभुमीवर जोशी यांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानण्यात येत आहे.
मुरली मनोहर जोशी यांची ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास जोशी संघ मुख्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. यावेळी इतरही कुणी पदाधिकारी होते का हे कळू शकले नाही. सुमारे दीड तास जोशी मुख्यालयात होते व साडेसहाच्या सुमारास ते शहरातील एका तारांकित हॉटेलकडे रवाना झाले.
अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी जमीनदोस्त केली. त्या वेळी मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे अध्यक्ष होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वयाच्या अडवाणी व जोशी यांना ८९ व ८४ व्या वर्षी खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जोशी यांनी सरसंघचालकांशी घेतलेल्या भेटीला महत्त्व आले आहे. यासंदर्भात भाष्य करण्यास संघाच्या पदाधिकाºयांनी नकार दिला.