राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठकीस दांडी

By admin | Published: September 19, 2016 01:20 AM2016-09-19T01:20:06+5:302016-09-19T01:20:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीस २२हून अधिक नगरसेवक गैरहजर होते.

The meeting of the NCP corporators was called Dandi | राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठकीस दांडी

राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठकीस दांडी

Next


पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीस २२हून अधिक नगरसेवक गैरहजर होते. या विषयी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘पक्षाची
बैठक असताना असे काय काम होते, की ते २२ नगरसेवक बैठकीस आले नाहीत. पक्ष त्यांना महत्त्वाचा वाटत नाही, अशांंना याचा जाब विचारा, अशा सूचना तटकरे यांनी शहरप्रमुखांना केल्या.
तानाजीनगर, चिंचवड येथील सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. या वेळी प्रदेशाध्यक्षांसह महापौर शकुंतला धराडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवानी, महिलाध्यक्षा सुजाता पालांडे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, नारायण बहिरवाडे, नाना काटे, शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे आदी उपस्थित होते. या आढावा बैठकीस महापौर धराडे आणि झामा बारणे वगळता आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक बहुतांश नगरसेवकांनी दांडी मारली होती. या विषयी तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘सत्ता हेच उद्दिष्ट असणारे लोक सत्तेबरोबर राहतात. आपल्याला ज्या पक्षाने पद, प्रतिष्ठा दिली त्यांना विसरू नये.’’
सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम आणि शहराध्यक्ष वाघेरे यांनी भाजपाकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. वाघेरे म्हणाले, ‘‘मूर्तीखरेदीचे भांडवल केले जात आहे. विनाकारण टीका केली
जात आहे. पंचवीस लाखांच्या निविदेत २४ लाखांचा भ्रष्टाचार कसा काय होऊ शकतो?’’ (प्रतिनिधी)
>गटबाजीमुळे नुकसान
गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, हा मुद्दा माजी आमदार विलास लांडे यांनी मांडला. ते म्हणाले, ‘‘मार्केटिंग करण्यात आपण कमी पडलो. नेते आले, की काही लोक येतात. दिशाभूल करण्याचे काम केले जाते. बैठकांना सर्वांना बोलवायला हवे. एकजूट करायला हवी. प्रभागांचे असंख्य तुकडे केले आहेत, ही बाबही गांभीर्याने घ्यावी. पक्षाच्या नावावर मोठे झाले ते आता कोठे गेले. सर्वांना बरोबर घेऊन काम करायला हवे. पक्षाबरोबर नसणारांना आपलेच लोक मदत करतात. भोसरीतील कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ नये, याची दक्षता नेत्यांनी घ्यावी.’’

Web Title: The meeting of the NCP corporators was called Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.