एसटीबरोबरची बैठक गुंडाळली

By admin | Published: August 30, 2016 01:54 AM2016-08-30T01:54:51+5:302016-08-30T01:54:51+5:30

ग्रामीण भागात एसटीमुळे होत असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीवरून बोलावलेल्या विशेष बैठकीला सदस्यच गैरहजर राहिल्याने या बैठकीत

A meeting with ST was wrapped up | एसटीबरोबरची बैठक गुंडाळली

एसटीबरोबरची बैठक गुंडाळली

Next

पुणे : ग्रामीण भागात एसटीमुळे होत असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीवरून बोलावलेल्या विशेष बैठकीला सदस्यच गैरहजर राहिल्याने या बैठकीत एसटीच्या अधिकाऱ्यांनीच त्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी खंत व्यक्त करीत हे सदस्यांचे बरोबर नाही, तमुच्या समस्या कशा सुटणार? असा सवाल केला.
नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत एसटीच्या गैरसोयीबद्दल सदस्यांनी अनेक तक्रारी केल्या. त्यामुळे याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आश्वासन कंद यांनी या वेळी दिले. तसेच ही बैैठक २९ आॅगस्ट रोजी होईल असेही जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी ही बैठक झाली. याला जिल्ह्यात एसटीच्या १३ डेपो मॅनेजरसह एसटी महामंडळाचे टेक्निकल हेड अरुण गोले आपल्या टीमसह उपस्थित होते. मात्र ७५पैकी चार सदस्य वगळता कोणीच उपस्थित राहिले नाहीत.
जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, कुलदीप कोंडे यांच्यासह दोन महिला सदस्य उपस्थित होत्या. सुरुवातीला आशा बुचके व सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनीच बैठक सुरू केली. त्यानंतर अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे उपस्थित राहिले. कंद यांनी अधिकाऱ्यांना या वेळी विद्यार्थ्यांची गैरसोयी होऊ नये, त्यांना वेळेवर शाळेत जाता यावे व शाळेतून परत वेळेत घरी येता यावे, अशी व्यवस्था करा अशा सूचना दिल्या.
त्यानंतर मग अधिकाऱ्यांनीच आपल्या समस्यांचा पाढा वाचला. आमच्याकडे सद्यस्थितीत ३८४ वाहक कमी आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांमध्ये १६७ रस्ते खराब असून, त्यांची यादीच त्यांनी तेथे दिली. तसेच एसटी मुक्कामाच्या ठिकाणी १६१ गावांमध्ये आमच्या चालक, वाहकांची शौचालयाची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. यावर अध्यक्ष कंद यांनी त्या गावांची यादी द्या, मी ग्रामपंचायतींना सूचना करून त्यांची व्यवस्था कशी होईल हे पाहतो. तसेच जेथे काहीच व्यवस्था नाही तेथे काय करता येईल हे आपण पाहू असे आश्वासन दिले.
आशा बुचके यांनी अधिकाऱ्यांना तालुक्यातील एसटी महामंडळाच्या जागा शोधून त्या नावावर करून घ्या असे आवाहन केले. तसेच जुन्नर तालुक्यातील गैरसोयी मांडल्या. कुलदीप कोंडे यांनी वेल्हेत एसटी डोपाची मागणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: A meeting with ST was wrapped up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.