खामगावला तिसरे विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन

By admin | Published: May 14, 2014 07:16 PM2014-05-14T19:16:26+5:302014-05-14T23:10:09+5:30

खामगावला तिसरे विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन अध्यक्षपदी रंगनाथ नाईकडे यांची निवड,येत्या ऑगस्ट महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे होत आहे

Meeting of third Vidarbha Competitive Examination Literature in Khamgawa | खामगावला तिसरे विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन

खामगावला तिसरे विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन

Next

मुंबई : तिसरे विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन येत्या ऑगस्ट महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सनदी अधिकारी व समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांचे खासगी सचिव रंगनाथ नाईकडे (भारतीय विदेश सेवा) यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी गुरुकुंज मोझरी येेथे सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरानिमित्त एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नियोजित संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ नाईकडे उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या पहिल्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव जे.पी.डांगे (आयएएस) यांनी भूषविले असून दुसर्‍या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत असणारे राज्य माहिती आयुक्त रविंद्र जाधव (आयएएस) यांची निवड करण्यात आली होती. (प्रतिनिधी)











 

Web Title: Meeting of third Vidarbha Competitive Examination Literature in Khamgawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.