साहित्य संमेलनाध्यक्ष आज ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 02:30 AM2019-09-22T02:30:08+5:302019-09-22T02:30:57+5:30
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उद्या, २२ रोजी उस्मानाबादमध्ये होणाऱ्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडला जाणार ...
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उद्या, २२ रोजी उस्मानाबादमध्ये होणाऱ्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. याच बैठकीत संमेलनाच्या तारखा आणि तीन दिवसीय कार्यक्रम पत्रिकाही जाहीर केली जाणार आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी फादर फ्रॉन्सिस दिब्रिटो यांचे नाव पुढे आले आहे. या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.
संमेलनाध्यक्षपदासाठी घटक, सामाविष्ट आणि संलग्न संस्थांकडून वेगवेगळ्या नावांची यादी महामंडळातर्फे मागविली जाते. मात्र बैठकीपूर्वीच यादीतील नावांची चर्चा होते. त्यामुळे ही चर्चा टाळण्यासाठी आणि नावे गोपनीय ठेवण्यासाठी यंदा बैठकीच्या दिवशीच चार घटक संस्थांनी प्रस्तावित नावे बैठकीत द्यायची असा बदल केला आहे. बैठकीत शक्यतो बहुमतानेच अध्यक्ष निवडीवर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रविवारी बैठकीनंतर दुपारी महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील पत्रकार परिषदेत नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करतील.
फादर फ्रॉन्सिस दिब्रिटोंच्या नावाची चर्चा उस्मानाबाद येथे होणाºया संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी फादर फ्रॉन्सिस दिब्रिटो यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची नावेही चर्चेत आहेत.