मराठी सारस्वतांचा आजपासून मेळा
By Admin | Published: January 15, 2016 04:50 AM2016-01-15T04:50:35+5:302016-01-15T05:07:25+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये आज सकाळी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ होणार आहे. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस
पिंपरी (पुणे) : संत अन् यंत्रभूमी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी सकाळी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ होणार आहे. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर भाजपाचाही विरोध मावळला. त्यामुळे संमेलन निर्विघ्न पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संतांचा वारसा सांगण्यासाठी सभा मंडपासमोरच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
संमेलनस्थळी आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे यांची थ्री डायमेन्शनल शिल्पाकृती
उभारली आहे.
200 सुरक्षा रक्षकांसोबत५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे पथकही येथे तैनात असेल.