‘एमपीएससी’मार्फत  हाेणार मेगाभरती, ३० एप्रिलला पूर्वपरीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 06:13 AM2023-01-21T06:13:12+5:302023-01-21T06:13:37+5:30

गट ब, क च्या ८,१६९ जागांसाठी होणार परीक्षा

Mega recruitment through 'MPSC', preliminary examination on 30th April | ‘एमपीएससी’मार्फत  हाेणार मेगाभरती, ३० एप्रिलला पूर्वपरीक्षा

‘एमपीएससी’मार्फत  हाेणार मेगाभरती, ३० एप्रिलला पूर्वपरीक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता. एमपीएससीने शुक्रवारी मेगा भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे.

या पदांसाठीची संयुक्त पूर्वपरीक्षा ३० एप्रिलला राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा हाेणार आहे. यातील महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही २ सप्टेंबर रोजी, तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. उमेदवारांना एमपीएससीच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी आहे.

कोणत्या पदांची जाहिरात

पदे -- वेतनश्रेणी -- भरतीची पदे

  • सहायक कक्ष अधिकारी    ३८,६००- १,२२,८००    १५ 
  • राज्य कर निरीक्षक    ३८,६००- १,२२,८००    १५९
  • पोलिस उपनिरीक्षक    ३८,६००- १,२२,८००     ३७४
  • दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक    ३८,६००- १,२२,८००    ४९
  • दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क    ३२,०००- १,०१,६००    ६ 
  • तांत्रिक सहायक    २९,२००- ९२,३००    १
  • कर सहायक    २५,५००- ८१,१००    ४६८
  • लिपिक-टंकलेखक    १९,९००- ६३,२००    ७०३४

(महागाई भत्ता व इतर भत्ते अतिरिक्त)

Web Title: Mega recruitment through 'MPSC', preliminary examination on 30th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.