तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
By Admin | Published: May 14, 2017 05:19 AM2017-05-14T05:19:13+5:302017-05-14T05:19:13+5:30
रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ११.४५ ते ४.१५ वाजेदरम्यान कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर, हार्बर रेल्वेवर ११.१० ते ४.१० वाजेदरम्यान कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान जलद मार्गावरील दुरुस्ती कामामुळे सर्व लोकल धीम्या मार्गावरुन चालवण्यात येतील. परिणामी या लोकल गंतव्य स्थानावर सुमारे २० मिनिटे उशीराने पोहचतील. १०.०८ ते २.४२ दरम्यान सीएसटी येथून सुटणारी डाऊन जलद लोकल नेहमीच्या थांब्या व्यतिरिक्त विक्रोळी, भांडूप, मुलूंड या स्थानकांवर थांबवण्यात येतील.
हार्बर रेल्वेवरील कुर्ला ते वाशी मार्गावर ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्ती काम पार पडेल. यावेळी हार्बर मार्गावर अप आणि डाऊन मार्ग बंद राहील. प्रवाशांना ट्रान्स हार्बर-मध्य प्रवास करण्याची मुभा आहे. दरम्यान, सीएसटी ते कुर्ला व वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. पावसात लोकल सेवा सुरळीत राहावी यासाठी मेगाब्लॉकच्या माध्यमाने विशेष उपाय करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहेत.
>प.रे.वर नाईट ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी रात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री ३ ते ५ या वेळेत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दुरुस्तीचे काम होणार आहे. यामुळे ब्लॉक दरम्यान काहीअंशी जलद लोकल रद्द करण्यात येतील.