ठाण्यात ‘मेळघाट पॅटर्न’
By admin | Published: April 4, 2015 04:37 AM2015-04-04T04:37:38+5:302015-04-04T04:37:38+5:30
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील आदिवासी, दुर्गम भागांतील कुपोषण रोखण्यासाठी ‘मेळघाट पॅटर्न’ राबवण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत
Next
सुरेश लोखंडे, ठाणे
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील आदिवासी, दुर्गम भागांतील कुपोषण रोखण्यासाठी ‘मेळघाट पॅटर्न’ राबवण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. ‘१०६४५ बालके कुपोषित’ या मथळ्याखाली दोन्ही जिल्ह्यांतील कुपोषितांची व्यथा २७ मार्च रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयाने त्याची तत्काळ दखल घेतली.
आमदार आनंद भाई ठाकूर यांनी वृत्ताची दखल घेऊन तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ठाण्यात मेळघाट पॅटर्न राबवण्याची वेळ आल्यामुळे आरोग्य विभागाचे चांगलेच वाभाडे निघाले आहेत.