जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांचा मनसेत प्रवेश
By admin | Published: May 20, 2016 02:59 AM2016-05-20T02:59:08+5:302016-05-20T02:59:08+5:30
इव्हेंट्सना विद्युतपुरवठा करणाऱ्या जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी प्रवेश केला. मुंबईमध्ये १,२00 जनरेटर व्हॅन्स आहेत.
मुंबई : मनसेत सिनेसृष्टीला तसेच अनेक इव्हेंट्सना विद्युतपुरवठा करणाऱ्या जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी प्रवेश केला. मुंबईमध्ये १,२00 जनरेटर व्हॅन्स आहेत. २0१४ मध्ये जनरेटर्सच्या मालकांची जीओए संघटना स्थापन करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी जनरेटर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिनाझ अली, कार्याध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जीओएने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची संलग्नता स्वीकारली. या वेळी मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. इतर राज्यांमध्ये जनरेटर्सबाबतच्या नियमांचे पालन होते, त्याप्रमाणे मुंबईत पालन होत नाही. त्याचा फटका येथील जनरेटर्स व्यावसायिकांना होतो, अशी समस्या यावेळी जीओएच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडली. त्यावर ठाकरे यांनी चित्रपट सेनेने निर्मात्यांसोबत दर महिन्याला बैठका घ्याव्यात आणि संबंधित व्यावसायिकांच्या अडचणी सांगाव्यात. आपले मुद्दे मांडताना पदाचा गैरवापर कुणी करणार नाही याची मात्र काळजी घेण्यास सांगितले.