बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा

By admin | Published: November 17, 2015 01:17 PM2015-11-17T13:17:22+5:302015-11-17T13:19:19+5:30

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अखेर जागा मिळाली असून दादरमधील महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक होईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Memorial Mayor of Balasaheb Thackeray - Inauguration of Chief Minister | बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १७ - बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अखेर जागा मिळाली असून दादरमधील महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक होईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आमच्या कार्यकाळात या स्मारकाचे पूर्ण होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत स्मारक व्हावे अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून होत होती. गेल्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्दितीय स्मृतीदिनी राज्य सरकारने स्मारकासाठी उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने मुंबई व परिसरातील आठ जागांची पाहणी केली. आज बाळासाहेबांच्या तृतीय स्मृतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत स्मारकाबाबत घोषणा केली. महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक तयार केले जाईल असे फडणवीस यांनी सांगितले. स्मारकाच्या कामात निधीचा प्रश्न येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. स्मारकासाठी पब्लिक ट्रस्टची निर्मिती केली जाईल. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे असतील व ट्रस्टच्या देखरेखीखाली स्मारकाचे काम केले जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महापौरांसाठी अन्यत्र निवासस्थान उपलब्ध करुन दिले जाईल असे फडणवीस यांनी नमूद केले. 

स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे आभार मानले. महापौर बंगल्याचा शिवसेनेवर आशिर्वाद होता, तर शिवाजी पार्क ही शिवसेनेची कर्मभूमी आहे. त्यामुळे महापौर बंगल्याच्या जागेला विशेष महत्त्व आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  

Web Title: Memorial Mayor of Balasaheb Thackeray - Inauguration of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.