महिलांच्या अबोली रिक्षांवर पुरुषांची मक्तेदारी
By admin | Published: March 31, 2017 04:03 AM2017-03-31T04:03:52+5:302017-03-31T04:03:52+5:30
पनवेल परिसरात अबोली रिक्षा चालविणाऱ्या एकमेव महिला चालकाला इतर रिक्षाचालक दमदाटी करीत भाडे स्वीकारू देत
पनवेल : पनवेल परिसरात अबोली रिक्षा चालविणाऱ्या एकमेव महिला चालकाला इतर रिक्षाचालक दमदाटी करीत भाडे स्वीकारू देत नसल्याची तक्र ार वाहतूक शाखा व आरटीओकडे करण्यात आली आहे. पनवेल शहरातील महिला प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या अबोली रिक्षा योजनेत पुरुष रिक्षाचालकांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी खास महिला चालकांसाठी दिलेले परवाने दिखाऊपणाचा फार्स ठरत असून महिलांच्या नावे खरेदी केलेल्या बहुतांशी अबोली रिक्षा चक्क पुरु ष चालकांमार्फत चालविल्या जात असल्याचे चित्र सध्या पनवेल शहरात दिसत आहे.
महिला चालक असलेल्या अबोली रिक्षा शहरात चालवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष पुढाकार घेतला. शहरातील महिला प्रवाशांचे सारथ्य करण्यासाठी १० रिक्षांच्या परवान्यांचे पनवेलमध्ये वाटप करण्यात आले. मात्र, नवीन पनवेल (सुकापूर) येथील शालिनी गुरव या एकच महिला ही रिक्षा चालवत आहेत. तर उर्वरित ९ अबोली रिक्षा पुरु ष चालवत आहेत. गुरव यांना पुरु ष रिक्षाचालक भाडे घेण्यास देत नसल्याची तक्र ार गुरव यांनी पनवेल वाहतूक शाखा व आरटीओकडे केली आहे.
नवीन पनवेल येथील डी मार्ट, रेल्वे स्थानक, बस स्थानक, ओरीयन मॉल या रिक्षा स्थानकात त्यांना प्रवासी भाडे घेऊन देत नाहीत तसेच आपल्यावर दमदाटी करण्यात येत असल्याचे त्यांनी तक्र ारीत म्हटले आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी गुरव यांनी वाहतूक शाखा व आरटीओ कडे केली
आहे. अबोली रिक्षा पुरुष रिक्षाचालकाने चालवणे गैर असून कायद्याचा भंग करणारा प्रकार आहे. त्यामुळे हा गैरप्रकार रोखण्यासाठी महिला रिक्षाचालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आरटीओने करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
अबोली रिक्षा महिलांनीच चालवावी, असे शासनाचे आदेश असून पुरु षांनी चालवण्यासाठी कोणतीही मोकळीक देण्यात आलेली नाही. पुरु ष रिक्षाचालक अबोली रिक्षा चालवताना दिसत असल्याने परिवहन विभागाकडून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या रिक्षाचालकांवर ताबडतोब कारवाई करण्यात येईल
-विजय कादबाने, पनवेल वाहतूक शाखा, पोलीस निरीक्षक