शेतक-याच्या नावावर मोजला व्यापा-याचा माल!
By admin | Published: March 22, 2017 02:48 AM2017-03-22T02:48:58+5:302017-03-22T02:48:58+5:30
तेल्हारा येथील नाफेड केंद्रावरील प्रकार; दोन टोकन संशयास्पद!
सदानंद खारोडे
तेल्हारा, दि. २१- येथील नाफेडच्या केंद्रावर बोगस पावत्यांवर तुरीचे मोजमाप करण्यात आल्याचा प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंगमध्ये समोर आला आहे. व्यापार्याचा माल शेतकर्याच्या नावावर मोजल्याचा हा प्रकार असल्याची चर्चा आहे.
नाफेडमध्ये तूर खरेदीस आणताना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेश पत्रिका भरून घेते. यामध्ये शेतकर्यांचे नाव, गाव, धान्याचा प्रकार, वजन, गाडी नंबर, फॅक्टरीचे नाव, गट नंबर, दाखला, दिनांकासह माहिती भरली जाते.
याबाबतची नोंद नाफेडच्या रजिस्टरमध्ये असणे गरजेचे आहे; परंतु या ठिकाणी बाजार समितीमधील आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंद आहे; परंतु नाफेड रजिस्टरमध्ये नोंद ॅहोत नाही. या संदर्भात सदर रजिस्टरमध्ये नोंद नसलेल्या शासकीय खरेदी प्रवेश पत्रिका टोकन क्रमांक 0६४, 0६५ या संशयास्पद पावती ह्यलोकमतह्ण च्या हाती लागल्या आहेत. सदर पावत्यावरसुद्धा धान्य मार्केटमधील आवक रजिस्टरमध्ये नोंद झालेली आहे असे वरून लिहिलेले आहे. विशेष म्हणजे या पावत्यांचा आधीचा अनुक्रमांक व नंतरचा अनुक्रमांक असलेल्या पावत्या कुण्याही शेतकर्यांकडे नाहीत नाही. तसेच या पावत्यांची नाफेडच्या रजिस्टरमध्ये कसलीही नोंद नसतानाही पावतीवरील तुरीचे मोजमाप करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे, शेतकर्याच्या नावावर व्यापार्याची तूर या पावत्यावर विकल्याचे समोर आले आहे. गेल्या दीड महिन्यापासून बाजार समिती यार्डात सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतकर्यांच्या मालाची नासाडी होत आहे.
डुकराच्या त्रासाबरोबरच किरकोळ चोरीचे प्रकारसुद्धा येथे घडले.
बाजार समितीच्या यार्डात असलेल्या मालाची देखरेख करणे, बाजार समितीचे काम असले तरी बाजार समिती प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. या केंद्रावर शेतकर्यांच्या मालापेक्षा व्यापारी, दलालाच्या मालाचे मोजमाप त्वरित होते.