७० बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांचे परवाने धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 06:27 AM2018-04-11T06:27:54+5:302018-04-11T06:28:08+5:30

शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने हरभ-याची खरेदी करणा-या शहादा बाजार समितीतील आठ व्यापाºयांचे परवाने मंगळवारी रद्द करण्यात आले. राज्यातील ७० बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी हमीभावाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचेही परवाने धोक्यात आले आहेत.

Merchants' licenses to 70 market committees threat | ७० बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांचे परवाने धोक्यात

७० बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांचे परवाने धोक्यात

Next

- रमाकांत पाटील 
नंदुरबार : शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने हरभ-याची खरेदी करणा-या शहादा बाजार समितीतील आठ व्यापा-यांचे परवाने मंगळवारी रद्द करण्यात आले. राज्यातील ७० बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी हमीभावाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचेही परवाने धोक्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला.
बाजार समित्यांचे दोन दिवसांतील खरेदी दर आॅनलाइनवर तपासल्यानंतर, बहुतांश ठिकाणी हरभºयाची कमी दराने खरेदी झाल्याचे आढळले. ९ एप्रिलला १२१ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये हरभरा खरेदी झाली. त्यात लातूरमध्ये क्विंटलला सर्वाधिक सहा हजार ९९९ दर मिळाला. अमरावतीत चार हजार ८७ रुपये, नागपूरमध्ये तीन हजार २०० ते तीन हजार ५७० असा भाव मिळाला. लासलगावमध्ये तर हमीभावाच्या निम्म्यापेक्षाही कमी भावाने म्हणजे दोन हजार रुपये क्विंटलने हरभरा खरेदी झाला आहे. शिरपूर, पुणे, दोंडाईचा, माजलगाव, जालना आदी काही बाजार समित्यांमध्ये चार हजार ४०० पासून सात हजारापर्यंतही भाव देण्यात आला. मात्र, काहींनी हमीभावापेक्षा कमी दर दिला. नंदुरबारप्रमाणेच हमीभावापेक्षा कमी दर दिलेल्या बाजार समित्यांच्या व्यापाºयांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
नियमभंग करणाºया इतर व्यापाºयांवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शहादाप्रमाणेच राज्यभर आंदोलन करेल. शेतकºयांची फसवणूक करणाºयांवर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तूपकर यांनी दिला.
हमीभावाचा कायदा काय?
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमानुसार कारवाई
करण्याचा अधिकार बाजार समितींना आहे. महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन १९६३ चा नियम आणि १९६७ मधील ९४ ड (३) यानुसार व्यापाºयांचे परवाने
रद्द करण्याचे अधिकार समितींना आहेत. त्याच कायद्यानुसार शहाद्यातील आठ व्यापाºयांचे परवाने रद्द केले आहेत.
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाचे फलित
शहादा बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याचे सांगत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चार दिवसांपूर्वी आंदोलन सुरू केले होते.
त्याला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी शेतकºयांवर लाठीमार केला. त्या विरोधात शेतकºयांनी मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून काही
लेखी आश्वासने दिली. त्यात शहादा बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा खरेदी करणाºया आठ व्यापाºयांचे परवाने निलंबित केले आहेत.

Web Title: Merchants' licenses to 70 market committees threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.