पारा@४५; उष्णतेची लाट, धुळीचे वादळ, अवेळी पावसासह उकाडा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:41 AM2019-05-23T06:41:59+5:302019-05-23T06:42:09+5:30
उत्तर भारतात येणार धुळीचे वादळ : आर्द्रतेमधील चढउतार मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक
मुंबई : मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू असतानाच देशासह राज्याच्या हवामानात मान्सूनपूर्व बदल नोंदविण्यात येत आहेत. या बदलाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर उत्तर भारतात काही ठिकाणी धुळीचे वादळ उठणार असून, काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शिवाय दक्षिण भारतातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्याचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसहून अधिक नोंदविण्यात येत असून, मुंबईचे कमाल तापमान ३३ ते ३४ अंशावर स्थिर आहे. मात्र आर्द्रतेमधील चढउतार मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक ठरत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार...
च्जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर वाढेल. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये धुळीच्या वादळासह पावसाची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये हवामान उष्ण आणि कोरडे राहील. विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येईल.
च्आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व बिहार, झारखंड आणि ओरिसामध्ये पावसाची शक्यता आहे. तेलंगणामध्ये उष्णतेची लाट येईल. केरळ आणि कर्नाटकमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तेलंगणा, रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर पाऊस राहील.
विदर्भात उष्णतेची लाट
२३ मे : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.
२४ आणि २५ मे : विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
२६ मे : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची
लाट येईल.
कोकणात पावसाची शक्यता
२३ मे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
२४ मे : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
च्मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
च्राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात
आले आहे.
मुंबई राहणार ढगाळ
च्गुरुवारसह शुक्रवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील.
च्मुंबईची आर्द्रता ८० टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत असून कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे.