पारा चढला; चंद्रपूर @ ४७़२
By Admin | Published: May 25, 2017 01:43 AM2017-05-25T01:43:30+5:302017-05-25T01:43:30+5:30
सूर्य आग ओकू लागल्याने जीवाची लाही, लाही होऊ लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सूर्य आग ओकू लागल्याने जीवाची लाही, लाही होऊ लागली आहे. विदर्भ,मराठवाडा, खान्देशमधील पारा चाळीशीपार झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईकरही घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. बुधवारी राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४७.२ अंश सेल्सिअस एवढे विक्रमी नोंदविले गेले. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे़ मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे़ २६ ते २८ मे दरम्यान दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़
राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई ३४़८, अलिबाग ३५़३, रत्नागिरी ३३़८़, डहाणू ३५़५, पुणे ३९़१, कोल्हापूर ३६, औरंगाबाद ४१़४़,नाशिक ३९़२.