गुणवंत विद्यार्थ्याचेच कापले होते तिकीट!

By admin | Published: January 15, 2017 03:14 AM2017-01-15T03:14:52+5:302017-01-15T03:14:52+5:30

मागील निवडणुकीप्रमाणे यंदा मनसेने उमेदवारांना परीक्षेच्या संकटात टाकायचे नाही, असे ठरविले आहे. गेल्यावेळी गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर झळकलेला सातपूरचा

The meritorious student was cut off the ticket! | गुणवंत विद्यार्थ्याचेच कापले होते तिकीट!

गुणवंत विद्यार्थ्याचेच कापले होते तिकीट!

Next

नाशिक : मागील निवडणुकीप्रमाणे यंदा मनसेने उमेदवारांना परीक्षेच्या संकटात टाकायचे नाही, असे ठरविले आहे. गेल्यावेळी गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर झळकलेला सातपूरचा उमेदवार सुरेश भंदुरे यांनी यंदा मात्र निवडणुकीपासून दोन हात दूर राहणे पसंत केले आहे. परीक्षेचा हेतू चांगला होता पण स्थानिक पातळीवर सुपरव्हिजन करणाऱ्यांनी तेव्हा माझेच तिकीट कापले होते, असा गौप्यस्फोट करत त्यांनी परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गेल्यावेळी ६१५ इच्छुकांनी परीक्षा दिली. सातपूरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश भंदुरे हे १०० पैकी ९७ गुण मिळवित प्रथम आले. त्याखालोखाल २० उमेदवारांनी ९० पेक्षा अधिक गुण संपादन केले होते, तर ७० ते ८० गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक होती. मात्र सर्वांत कमी ५२ गुण मिळविलेल्या एका महिला उमेदवारालाही तिकीट बहाल झाले होते. (प्रतिनिधी)

हेतू चांगला, पण... : उमेदवारांची परीक्षा घेण्याचा राज ठाकरे यांचा हेतू चांगला होता, परंतु स्थानिक पातळीवर काही नेत्यांनी राजकारण करत त्याला हरताळ फासला. मात्र, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मला उमेदवारी मिळाली. यंदा निवडणूक न लढविण्याचे ठरविले आहे. पक्षाचा आदेश आलाच तर कुटुंबातील सदस्याचा विचार केला जाईल, असे मनसेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुरेश भंदुरे यांनी सांगितले.

Web Title: The meritorious student was cut off the ticket!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.