देशाला संदेश द्यायचा होता !

By admin | Published: December 2, 2014 04:37 AM2014-12-02T04:37:21+5:302014-12-02T04:37:21+5:30

मुस्लीम धर्मात महिलांना तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करायला विरोध आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्रीला त्याबद्दल धडा शिकवला तर संपूर्ण देशाला सबक मिळेल

Message to the country! | देशाला संदेश द्यायचा होता !

देशाला संदेश द्यायचा होता !

Next

मुंबई : मुस्लीम धर्मात महिलांना तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करायला विरोध आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्रीला त्याबद्दल धडा शिकवला तर संपूर्ण देशाला सबक मिळेल, म्हणून गौहर खानवर हात उचलला, अशी धक्कादायक कबुली कॅटरिंगवाल्याकडे मजुरी करणाऱ्या मोहंमद अकील या २४ वर्षीय तरुणाने आरे पोलिसांना दिली.
काल अकीललने सर्वांसमोर गौहरच्या कानशिलात भडकावली व तिच्याशी असभ्य वर्तन केले. ही घटना फिल्मसिटीतल्या इंडियाज रॉ स्टार या रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर घडली. या शोमध्ये गौहर निवेदिकेच्या भूमिकेत होती. काल या शोच्या चित्रीकरणाचा अखेरचा दिवस होता.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्याहून रोजीरोटीसाठी मुंबईत आलेला अकील पडेल ते काम करीत असे. गेल्या काही दिवसांपासून तो कॅटरिंग चालकाकडे वेटर म्हणून काम करीत होता. गेल्या तीनेक दिवसांपासून काम आटोपून तो फिल्मसिटीत येई. येथील ९ नंबरच्या स्टुडिओत गौहरचे शूटिंग सुरू होते. नेहमीप्रमाणे कालही अकील या स्टुडिओत बघ्यांच्या गर्दीत उपस्थित होता. मात्र अचानक तो सेटवर गेला आणि त्याने चारचौघात गौहरच्या कानशिलात भडकावली. अचानक घडलेल्या या घटनेने गौहर भयभीत झाली, तर हा प्रकार पाहााारे सर्वच अवाक् झाले. भानावर आलेल्या काहींनी धावपळ करून अकीलला पकडले. गर्दीतल्याच कोणीतरी पोलिसांना फोन करून सेटवर बोलावून घेतले. पुढे आरे पोलिसांनी गौहरच्या तक्रारीवरून अकीलविरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला व त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत धाडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अकीलला या कृत्याचा जराही पश्चाताप नाही. दहावी शिकलेल्या अकीलवर धर्माचा पगडा असून तोकडे कपडे घालणाऱ्या महिलांबाबत त्याच्या मनात चीड आहे. गौहरवर हल्ला केल्यास हा संदेश देशभर जाईल आणि आपलीही प्रसिद्धी होईल, या विचाराने त्याने हा हल्ला केला, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Message to the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.