‘लोकमत सखी गणोश मंडळा’चा कृतिशीलतेचा संदेश

By admin | Published: August 30, 2014 11:16 PM2014-08-30T23:16:16+5:302014-08-30T23:16:16+5:30

लोकमत’ने यंदाच्या गणोशोत्सवात कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणा:या ‘आपले बाप्पा’ या उपक्रमाची सुरूवात केली आहे. याला पहिला कृतिशील प्रतिसाद ‘लोकमत सखी मंचा’ने दिला.

Message of 'Lokmat Sakhi Ganosh Mandal' | ‘लोकमत सखी गणोश मंडळा’चा कृतिशीलतेचा संदेश

‘लोकमत सखी गणोश मंडळा’चा कृतिशीलतेचा संदेश

Next
पुणो : ‘लोकमत’ने यंदाच्या गणोशोत्सवात कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणा:या ‘आपले बाप्पा’ या उपक्रमाची सुरूवात केली आहे. याला पहिला कृतिशील प्रतिसाद ‘लोकमत सखी मंचा’ने दिला. महिलांच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ असलेल्या सखी मंचाने ‘तिचा गणपती’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
 
‘लोकमत सखी मंच’च्या सभासदांनी ही संकल्पना ऐकली आणि पुण्यातूनच 
तिला प्रत्यक्ष स्वरूप देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तातडीने चित्र गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकमत सखी गणोश मंडळ’  स्थापन करण्यात आले. त्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. 
 
गणोशमूर्तीच्या निवडीपासून 
सजावटीर्पयत  आणि 
प्राणप्रतिष्ठापनेपासून खिरापतीच्या 
निवडीर्पयत सगळ्या गोष्टी या मंडळाने 
ठरविल्या. गणोश चतुर्दशीच्या दिवशी मंडळाच्या कार्यकत्र्यानी गणोशमूर्ती  आणली. पर्यावरणपूरकतेचा संदेश जपत  नैसर्गिक गोष्टी वापरून आकर्षक सजावट  केली. 
 
महापौर चंचला कोद्रे : 
सर्व स्तरातील लोकांनी एकत्रित येऊन सामाजिक भावना वाढीस लागावी, संघटन व्हावे, यासाठी लोकमान्य टिळकांनी हा उपक्रम सुरू केला. संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम साजरा होतो; मात्र यात आपल्याला मुलांचे, पुरूषांचेच गणोश मंडळे असल्याचे दिसते. महिलांचे गणोश मंडळ ही कल्पना प्रत्यक्षात अमलात आणणारे ‘लोकमत सखी गणोश मंडळ’ हे महाराष्ट्रातील पहिले गणोश मंडळ असेल. महिला प्रत्येक क्षेत्रत अग्रेसर आहेच, त्यातच महिलांनीच पौरोहित्य करून गणोशाची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या या ‘लोकमत सखी गणोश मंडळा’च्या प्रघाताचेही कौतुक आहे आणि पुणो शहराच्या वतीने या उपक्रमासाठी ‘लोकमत’चे अभिनंदन. 
सिंधूताई सपकाळ : 
बाई ही मुळातच निर्माती आहे. ‘ती’चे गणोश मंडळ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ’लोकमत’ने हा नवा रस्ता हाताळला आहे, त्यासोबत आता मजबुतीने, हिमतीने महिलांनी चालायला हवे. महिला इतकी हिंमत करत असतील, तर पुरूषांनीही त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आता कुठे त्या कर्तबगार होत आहेत, तर त्यांची पुरूषांनी काळजी घेतली पाहिजे. 
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे :
गणोशपूजनाचा मान मुख्यत: पुरूषांना दिला जातो. मात्र, ‘तिचा गणपती’ही संकल्पना फारच अभिनव आहे. गणपती ही बुद्धी आणि कलेची देवता.मात्र, प्राचीन काळात स्त्रियांना बुद्धीचा वापर करत शिक्षण घ्यायची बंदी होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आणि याचेच प्रतिबिंब या उपक्रमात पडलेले आहे. 
सहायक पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे :
हा उपक्रम अभिनंदनाला पात्र आहे. देव सगळ्यांना चांगली बुद्धी देवो, हीच इच्छा.
 

 

Web Title: Message of 'Lokmat Sakhi Ganosh Mandal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.