Surprise; संदेश मिळाला बंदोबस्ताचा; मात्र लाभ घेतला चित्रपट पाहण्याचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:06 PM2019-12-28T12:06:11+5:302019-12-28T12:08:42+5:30

पंढरपूरच्या डीवायएसपींचे सरप्राईज : महिला व पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी पाहिला चित्रपट

Message received from settlement; But took advantage of watching the movie! | Surprise; संदेश मिळाला बंदोबस्ताचा; मात्र लाभ घेतला चित्रपट पाहण्याचा !

Surprise; संदेश मिळाला बंदोबस्ताचा; मात्र लाभ घेतला चित्रपट पाहण्याचा !

Next
ठळक मुद्देसततच्या बंदोबस्तामुळे पोलिसांना तणावात काम करावे लागतेमहिला व पुरुष पोलीस कर्मचारी बंदोबस्ताबाबत माहिती ऐकण्यासाठी रांगेत थांबलेया सरप्राईजबद्दल पोलीस निरीक्षक गजानन माळींचे समाधान व्यक्त केले

पंढरपूर : सध्या ना कोणती निवडूक, ना वारी सोहळा, ना अचानक उद्भवलेला प्रसंग़़़ तरीही सर्व पोलिसांना त्वरित बंदोबस्तासाठीचे फर्मान आले़ लागलीच पोलीस अधिकारी व कर्मचारी शहर पोलीस ठाण्यात जमा झाले़ रिपोर्टिंगलाही सुरुवात झाली़ बंदोबस्त कोठे अन् कसा करायचा... कोणत्या पॉर्इंटला थांबायचे, याबाबत सूचना मिळण्याऐवजी आपण सर्व जण एकत्रित चित्रपट पाहायला जायचंय, हे शब्द उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या तोंडातून बाहेर पडताच सर्वच पोलीस अचंबित झाले अन् त्यांच्यावरील तणाव दूर झाला.

पंढरपूर शहरात व्हीआयपींचे दौरे, निवडणूक, आंदोलने, उपोषण, यात्रा, विविध कार्यक्रम, सतत काही ना काही कारणांमुळे बंदोबस्त असतोच़ याशिवाय शहरात होणाºया मारामारी, चोºया व अन्य विविध गुन्हे यामुळे पोलिसांना सतत तणावात काम करावे लागते. 
यामुळे पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी पंढरपूर उपविभागातील पोलिसांना सरप्राईज देण्याचे नियोजन केले होते. 

महत्त्वाचा पोलीस बंदोबस्त आहे, तुम्ही गणवेशात गुरुवारी दुपारी ३ वाजता पंढरपूर शहर, श्री विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण व करकंब विभागातील पोलिसांना बुधवारी निरोप देण्यात आला. त्यानुसार निरोप मिळालेले सर्व पोलीस दिलेल्या वेळेत तयारीनिशी हजर झाले. 

महिला व पुरुष पोलीस कर्मचारी बंदोबस्ताबाबत माहिती ऐकण्यासाठी रांगेत थांबले. मात्र त्या ठिकाणी डॉ. सागर कवडे यांनी तुम्हाला सर्वांना चित्रपट पाहायला जायचे आहे, असे सांगितले. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी सात गाड्या व एका बसचीही सोय केल्याचे सांगितले़ त्यानंतर सर्व जण पोलीस गाडी अन् बसमध्ये बसून मर्दानी हा चित्रपट पाहायला गेले़ त्यांच्या चेहºयावरील तणाव दूर झाल्याचे दिसून आले़ या सरप्राईजबद्दल पोलीस निरीक्षक गजानन माळींचे समाधान व्यक्त केले.

अधिकाºयांनी निभावली कुटुंब प्रमुखाची भूमिका
 पूर्वी कुटुंबातील सदस्यांसह चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला होता. परंतु सध्या रोजच्या व्यस्त जीवनामुळे चित्रपट पाहणे, त्यासारख्या गोष्टींना वेळ देता येत नव्हता. रोजच्या तणावातून मुक्तता मिळावी, यासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी कुटुंब प्रमुखाची भूमिका निभावत चित्रपट पाहण्यासाठी नेले होते. मर्दानी-२ हा चित्रपट महिला पोलिसांना प्रोत्साहन देणारा होता. सर्व अधिकाºयांचे मनापासून आभार, अशी भावना महिला पोलीस सोनाली इंगोले यांनी सांगितले़

सततच्या बंदोबस्तामुळे पोलिसांना तणावात काम करावे लागते. पंढरपूर उपविभागातील पोलिसांना थोडा आनंद मिळावा. तसेच अधिकारी व कर्मचारी मित्राप्रमाणे एकत्र यावेत, या उद्देशाने सर्वांना चित्रपट पाहण्याचे नियोजन केले होते.
- डॉ. सागर कवडे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर

मर्दानी-२ हा सिनेमा महिला पोलीस अधिकाºयांच्या कर्तबगारीवर प्रकाश टाकणारा व प्रोत्साहन, आत्मविश्वास वाढवणारा आहे़ शिवाय नवीन ऊर्जा, प्रेरणा देणारा, संघर्ष कसा केला जातो यावर आधारित आहे़ असा सिनेमा पोलिसांना पाहायला मिळेल, या दृष्टीने डीव्हीपी समूहाने नियोजन केले़
- अभिजित पाटील,
डीव्हीपी समूह प्रमुख, पंढरपूर

Web Title: Message received from settlement; But took advantage of watching the movie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.