मुक्त वसाहत योजनेतून ‘स्वयंरोजगार स्वयंघरी’चा संदेश
By admin | Published: July 6, 2014 11:16 PM2014-07-06T23:16:08+5:302014-07-06T23:27:20+5:30
८0 कुटुंबांना लाभ : जमीन हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण
वाशिम : विकासापासून कोसो दूर असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील भुमिहीन, बेघर व गोरगरीब कुटूंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेने आपल्या दारिद्रयावर मात करण्याचा आशेचा किरण दाखविला आहे. जिल्हयातील चार गावातील प्रत्येक २0 याप्रमाणे ८0 कुटूंबांची आवश्यक त्या मुलभुत सुविधांसह स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेतून ह्यस्वयंरोजगार स्वयंघरीह्णचा संदेश दिला जाणार आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमातीतील दुर्बल कुटूंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने ह्ययशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाह्ण हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. वाशिम जिल्हयात जिल्हास्तरीय समितीने दीड वर्षांपूर्वी भटक्या विमुक्तांची अधिक लोकवस्ती असलेल्या मेडशी, किन्हीराजा, पोहरादेवी व फुलउमरी या चार गावांची निवड केली होती. या चार गावांमधून प्रत्येकी २0 याप्रमाणे ८0 कुटूंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मध्यंतरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारंसहिता असल्याने गोरगरीब लाभार्थींची स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याच्या कामाला ब्रेक लागले होते. आचारसंहिता संपताच लाभार्थी निवडही पार पडली. ८0 कुटुंबांना स्वतंत्र घरकुल व वसाहत निर्माण करण्याबरोबरच स्वयंरोजगार देण्याचेही या योजनेत प्रस्तावित राहणार आहे. दीड वर्षांपूर्वी या चारही गावात शासनाच्या पाच एकर जागेची पाहणी करण्यात आली होती. जिल्हास्तरीय चमूने जागेची निवड केल्यानंतर या जागेच्या मोजणीसाठी २0१३ च्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भूमिअभिलेखच्या खात्यात आवश्यक ते शुल्कही जमा करण्यात आले होते. जमिन हस्तांतरणाची कार्यवाही पार पडल्यानंतर जमिन मोजणी आणि आता लाभार्थी निवडीची कार्यवाहीदेखील पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ८0 कुटुंबांना राहण्यासाठी घर आणि उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार मिळण्याच्या अपेक्षा आहेत.
** मुक्त वसाहत योजनेतून स्वतंत्र वसाहत निर्मिती
विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील भूमिहीन, बेघर कुटूंब, एका लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले, यापुर्वी घरकुल योजनेचा लाभ न घेतलेले व महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या लाभार्थींची या योजनेत जिल्हास्तरीय समितीने निवड केली आहे.
प्रत्येक गावातील २0 कूटुंबाची पाच एकरावर स्वतंत्र वसाहत शासनाकडून मोफत तयार केली जाणार आहे. प्रत्येक कुटूंबाला पाच गुंठे क्षेत्रफळ दिले जाईल. यावर घर बांधून दिले जाईल तसेच उर्वरीत जागा स्वयंरोजगारासाठी वापरता येणार आहे. जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया झाली आहे.