जबाबदार व्यक्तीकडून हर्षवर्धन पाटलांना निरोप पाठवला : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 01:01 PM2019-09-06T13:01:12+5:302019-09-06T13:02:04+5:30

दोन्ही पक्षांकडे २८८ उमेदवारांच्या याद्या आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. हर्षवर्धन पाटील जे बोलतात त्यात काहीही तथ्य असेल तर आपण स्वत: त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत. आजही मी त्यांना फोन करत आहे, परंतु, त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी आपण माध्यमांसमोर चर्चा करायला देखील तयार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

Message sent by the responsible person to Harshvardhan Patil says Supriya Sule | जबाबदार व्यक्तीकडून हर्षवर्धन पाटलांना निरोप पाठवला : सुप्रिया सुळे

जबाबदार व्यक्तीकडून हर्षवर्धन पाटलांना निरोप पाठवला : सुप्रिया सुळे

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदारपूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडत नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या वाटेवर असल्याचा इशारा दिला आहे. परंतु, त्यांनी आपला निर्णय जाहीर केला नाही. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी संदर्भात अनेक गौप्यस्फोट केले. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे.

सुळे म्हणाल्या की, हर्षवर्धन पाटल्यांच्या भाषणाचं आश्चर्य वाटलं. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही. आजही त्यांचा फोन लागत नसून एका जबाबदार व्यक्तीकडून त्यांना निरोप पाठवला आहे. हर्षवर्धन पाटलांसोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणामुळे दु:ख झाल्याचे सुळे यांनी म्हटले.

दोन्ही पक्षांकडे २८८ उमेदवारांच्या याद्या आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. हर्षवर्धन पाटील जे बोलतात त्यात काहीही तथ्य असेल तर आपण स्वत: त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत. आजही मी त्यांना फोन करत आहे, परंतु, त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी आपण माध्यमांसमोर चर्चा करायला देखील तयार असल्याचे सुळे यांनी सांगितले. हर्षवर्धन यांच्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीकडून सुळे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. याआधी काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी देखील इंदापूरच्या जागेचा प्रश्न चर्चेतून सोडवला जाऊ शकतो, असं म्हटलं होतं.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला बारामती मतदार संघातून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. परंतु, आपण राष्ट्रवादीला शब्द दिल्याचे त्यांना सांगितले. तसेच सुप्रिया सुळे यांना मदत करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितले होते. तर शरद पवारांनी इंदापूरविषयी निश्चित राहा असंही सांगितले होते. मात्र आता त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आपण आपली भूमिका १० सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Message sent by the responsible person to Harshvardhan Patil says Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.