मेट्रो भाडय़ाबाबत सोमवारी सुनावणी?
By admin | Published: July 6, 2014 12:36 AM2014-07-06T00:36:32+5:302014-07-06T00:36:32+5:30
मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यास लवाद स्थापन करावा, या मागणीसाठी आता एमएमआरडीएने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर याचिका दाखल केली
Next
मुंबई : मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यास लवाद स्थापन करावा, या मागणीसाठी आता एमएमआरडीएने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर याचिका दाखल केली असून, यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
एमएमआरडीने याआधी केलेल्या याचिकेनुसार, रिलायन्स कंपनीला नफा मिळावा म्हणून मेट्रो सेवा सुरू केलेली नाही़ नागरिकांना परवडेल असे भाडे असणो गरजेचे आहे; आणि करारानुसार रिलायन्स कंपनी परस्पर भाडेवाढ करू शकत नाही़ यासाठी समिती नेमलेली असून, तिने योग्य तो निर्णय घेतला नाही़ तेव्हा यासाठी न्यायालयानेच लवाद स्थापन करावा, अशी मागणी एमएमआरडीएने याचिकेत केली होती़ मात्र आम्ही केवळ 1क्, 2क्, 3क् व 4क् रुपयेच भाडे निश्चित केले असून, एमएमआरडीएला 9, 11 व 13 रुपये प्रवास भाडे हवे आह़े हे चुकीचे आह़े सध्या मेट्रो सुरू असलेल्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गाचे बस तिकीट 25 रुपये आह़े एसी बसचे भाडे 6क्, रिक्षाचे भाडे 163 तर टॅक्सीचे भाडे 2क्4 रुपये आह़े त्यामुळे आमचे प्रवास भाडे मुंबईकरांना नक्कीच परवडेल, असा दावा रिलायन्सने केला होता़
अखेर न्या़ रमेश धानुका यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. याविरोधात एमएमआरडीने द्विसदस्यीस खंडपीठासमोर याचिका केली आहे. (प्रतिनिधी)