विजेचे 'ते' मीटर रडारवर; महावितरणकडून तपासणी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 09:10 AM2021-08-14T09:10:56+5:302021-08-14T09:11:38+5:30

राज्यात असे एकूण ४३ लाख मीटर आहेत. यापैकी १.४० लाख मीटरची तपासणी करण्यात आली आहे.

On meter radar consuming up to 30 units of electricity | विजेचे 'ते' मीटर रडारवर; महावितरणकडून तपासणी मोहीम

विजेचे 'ते' मीटर रडारवर; महावितरणकडून तपासणी मोहीम

Next

नागपूर : वीज बिल थकबाकी वसुलीसोबतच महावितरणने आता शून्य ते ३० युनिटपर्यंत रिडींग दाखविणाऱ्या वीज मीटरची तपासणी सुरू केली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार ६०६ मीटर खराब आढळून आले आहेत. नागपूर प्रादेशिक विभाग म्हणजेच विदर्भाचा विचार केला तर ३८ हजार मीटरची तपासणी करण्यात आली असून यापैकी ५१९० वीज मीटरमध्ये गडबड आढळून आली आहे. 

राज्यात असे एकूण ४३ लाख मीटर आहेत. यापैकी १.४० लाख मीटरची तपासणी करण्यात आली आहे. महावितरणने गेल्या महिन्यातच ही तपासणी मोहीम सुरु केली. आतापर्यंत औरंगाबादमध्ये २९,४०७ मीटरची तपासणी करण्यात आली. यापैकी ६४९१ मीटर खराब आढळून आले. 

गुन्हे दाखल करणार
कोकण विभागात ५२,२१४ मीटरपैकी ६९२० व पुणे प्रादेशिक विभागात तपासण्यात आलेल्या २०,६६५ पैकी ४ हजार मीटर खराब आढळून आले.
तात्काळ कारवाई करीत या ग्राहकांना अचूक बिल दिले जात आहेत. उर्वरित मीटरची तपासणी सुरू आहे. ज्या २२,६०६ मीटरमध्ये योग्य रिडींग होत नव्हती त्यातील ८४१ ग्राहकांनी मीटरमध्ये गडबड केली होती. या सर्व ग्राहकांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित मीटर बदलविण्याची कारवाई सुरू आहे.

Web Title: On meter radar consuming up to 30 units of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज