मुंबईतील मेट्रो २ व मेट्रो ५ प्रकल्प मार्गी, ११ ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते भूमीपूजन
By admin | Published: October 6, 2015 01:53 PM2015-10-06T13:53:48+5:302015-10-06T15:49:12+5:30
मुंबईतील वाहतुकीला वेगवान करणारे मुंबई मेट्रो २ व मुंबई मेट्रो ५ या प्रकल्पाला मंगळवारी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - मुंबईतील वाहतुकीला वेगवान करणारे मुंबई मेट्रो २ व मुंबई मेट्रो ५ या प्रकल्पाला मंगळवारी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांचे ११ ऑक्टोबररोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे.
मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईकरांना दिलासा देणा-या दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो २ मधील दहीसर पूर्व - डी एन नगर या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. १८. ६० किलोमीटरच्या या मार्गात १७ स्टेशन असून यासाठी सुमारे ६, ४१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर मेट्रो ५ मधील अंधेरी पूर्व - दहीसर पूर्व या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. १६.५ किलोमीटरच्या मार्गात १६ स्टेशन्स असून या प्रकल्पासाठी ६,२०८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.