"मेट्रो 3"ला हायकोर्टाचा हिरवा कंदील, वृक्षतोडीवरील बंदी उठवली

By admin | Published: May 5, 2017 06:18 PM2017-05-05T18:18:28+5:302017-05-05T18:33:04+5:30

मेट्रो -3 प्रकल्पाला मुंबई हायकोर्टानं हिरवा कंदील दाखवला आहे. शिवाय, दक्षिण मुंबईत वृक्षतोडीवरील लावलेली बंदीही उठवली आहे.

"Metro 3" lifted the ban on the green lantern of the Hikort, tree plantation | "मेट्रो 3"ला हायकोर्टाचा हिरवा कंदील, वृक्षतोडीवरील बंदी उठवली

"मेट्रो 3"ला हायकोर्टाचा हिरवा कंदील, वृक्षतोडीवरील बंदी उठवली

Next

 ऑनलाइन  लोकमत

मुंबई, दि. 5 - मेट्रो -3 प्रकल्पाला मुंबई हायकोर्टानं हिरवा कंदील दाखवला आहे.  शिवाय, दक्षिण मुंबईत वृक्षतोडीवरील लावलेली बंदीही उठवली आहे. मात्र यावेळी याचिकाकर्त्यांच्या विनंतीनुसार निर्णयाला 10 दिवसांची स्थगिती देत त्यांना सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
 
"वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबईत मेट्रो आलीच पाहिजे. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मेट्रो-३ प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र याबरोबरच झाडाचे की मानवाचे आयुष्य जास्त महत्त्वाचे आहे, हे ठरवण्याचीही वेळ आली आहे", असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मेट्रो-३ प्रकल्पासंदर्भातील निकाल बुधवारी राखून ठेवला होता.
 
दक्षिण मुंबईतील चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी, विधानभवन या परिसरात मिळून मेट्रो 3 ची 9 स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी एमएमआरसीएल सुमारे पाच हजार झाडांची कत्तल करणार आहे. याविरुद्ध चर्चगेट व कफ परेडच्या रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.
 
मेट्रो प्राधिकरणानं या कामात होणारी वृक्षतोड भरुन काढण्यासाठी तितक्याच प्रमाणात वृक्षारोपण करणार असल्याची ग्वाही हायकोर्टात दिली आहे. तसेच यातील बरेचसे वृक्ष न तोडता दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यांच पुनर्रोपण करणार असल्याचंही प्राधिकरणानं कबूल केले आहे. यावर समाधान व्यक्त करत या वचनांची पूर्तता होते की नाही हे पाहण्यासाठी हायकोर्टाच्या सध्याच्या दोन न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, दुसरीकडे  याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेत मेट्रो-३ प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने (एमओईएफ) परवानगी दिली नसल्याचा दावा करण्यात आला होता.

(Night Shift: मुख्यमंत्र्यांनी केली "मेट्रो 3"च्या कामाची पाहणी)
तर 2 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री "मेट्रो 3" प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. त्यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या पाच ठिकाणांचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते.  
मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांना अडथळा होऊ नये, म्हणून मेट्रोच्या कामाची पाहणी रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले होते. या कामाच्या पाहणीचा दौरा त्यांनी आझाद मैदानापासून रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सुरू केला होता.
 
मेट्रोच्या बांधकामासाठी प्रीकास्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम करणे सोपे होत आहे. देशातील इतर मेट्रोच्या कामांपेक्षा मुंबईतील मेट्रोचे बांधकाम मोठ्या जलदगतीने सुरु असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
मुंबईमध्ये  "मेट्रो 3" च्या अंतर्गत कुलाबा-बांद्रा-सिप्झ असा साडे तेहत्तीस किलोमीटरचा भूमिगत मेट्रो मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. यामार्गावर 27 स्थानके असणार आहेत. त्यापैकी 26 स्थानके भूमिगत असतील. तसेच, कुलाबा ते सिप्झ हे अंतर या भुयारी मेट्रोने केवळ 50 मिनिटांत पार करता येईल. 

Web Title: "Metro 3" lifted the ban on the green lantern of the Hikort, tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.