‘मेट्रो-३’चे काम आॅक्टोबरपासून
By admin | Published: August 25, 2016 06:05 AM2016-08-25T06:05:45+5:302016-08-25T06:05:45+5:30
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गाच्या बांधकामासाठी बुधवारी चार कंत्राटदारांसमवेत करार केला.
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गाच्या बांधकामासाठी बुधवारी चार कंत्राटदारांसमवेत करार केला. या चार कंत्राटदारांना मेट्रोचे काम सहा टप्प्यांत विभागून देण्यात आले आहेत, तर एका कंत्राटदारासमवेत लवकरच या संदर्भातील करार करण्यात येणार आहे. मेट्रो ३ चे काम आॅक्टोबर महिन्यापासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली, तसेच शासकीय जमिनीपैकी ९० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>पॅकेज १ : २९८८.५३ कोटी
एल अँड टी व एसटीईसी समूह, स्थानके: कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक
पॅकेज २ : २५२१.८९ कोटी
एचसीसी-एमएमएस समूह, स्थानके: सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँटरोड
पॅकेज ३ : २५५७.८४ कोटी
डोगस-सोमा, स्थानके: मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, मेट्रो स्टेशन, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक व वरळी
पॅकेज ४ : २८३०.१० कोटी
सीईसी-आयटीडी, सीईएम-टीपीएल समूह, स्थानके: सिद्धीविनायक, दादर, मेट्रो व शीतलादेवी
पॅकेज ५ : २८१७.०२ कोटी
जे.कुमार सीआरटीजी, स्थानके: धारावी, बीकेसी मेट्रो, विद्यानगरी, सांताक्रुझ
पॅकेज ६ : २११८.४० कोटी
जे. कुमार-सीआरटीजी, स्थानके: सीएसआयए, सहार रोड, सीएसए-आंतरराष्ट्रीय
पॅकेज ७ : २२८१.४५ कोटी
एल अँड टी, एसटीईसी समूह, स्थानके: मरोळनाका, एमआयडीसी, सीप्झ
>पावसाळा संपण्याची प्रतीक्षा...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी याबाबत सांगितले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाचा एकूण खर्च १८ हजार ११४.९ कोटी एवढा आहे. मेट्रो ३ च्या सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गाचे बांधकाम सुरू करण्याकरिता आम्ही पावसाळा संपण्याची प्रतीक्षा करत आहोत. मेट्रो ३ मुंबईच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला जोडणार आहे. नरिमन पॉइंट, वांद्रे-कुर्ला संकुल, विमानतळ आणि सीप्झसारखी मोक्याची ठिकाणे मेट्रोमुळे जोडली जाणार आहेत. शिवाय काळबादेवी, वरळी, प्रभादेवी आणि अंधेरी, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी ही ठिकाणेही जोडली जाणार आहेत.