मेट्रो रेल्वेच्या एसपीव्हीला मंजुरी
By admin | Published: December 9, 2014 01:01 AM2014-12-09T01:01:15+5:302014-12-09T01:01:15+5:30
मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी संबंधित सर्व निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली एसपीव्ही (स्पेशल परपज व्हेईकल) ही संयुक्त कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
मुख्यमंत्र्यांचा पुढाकार : ब्रिजेश दीक्षित व्यवस्थापकीय संचालक
नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी संबंधित सर्व निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली एसपीव्ही (स्पेशल परपज व्हेईकल) ही संयुक्त कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत यासंबंधीचा प्रस्ताव त्वरित मंजूर केला. आता या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मिळणार असून एसपीव्ही स्थापन झाल्यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्य रेल्वेचे माजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांची राज्य सरकारतर्फे एसपीव्हीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाचे सचिव शंकर अग्रवाल हे अध्यक्ष असतील. या कंपनीमध्ये नगर विकास १ चे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, महापालिका आयुक्त, नासुप्र सभापती यांचा समावेश करण्यात आला आहे. या एसपीव्हीला सर्व आर्थिक अधिकार असतील.
लवकरच एसपीव्ही आता प्रकल्पासाठी कन्सलटन्ट नेमतील. कामांच्या निविदा मागविल्या जातील. (प्रतिनिधी)