मेट्रोखालील कामांचा प्रश्न

By admin | Published: April 4, 2015 04:43 AM2015-04-04T04:43:23+5:302015-04-04T04:43:23+5:30

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेखालील दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामाहून मुंबई महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास

Metro question below | मेट्रोखालील कामांचा प्रश्न

मेट्रोखालील कामांचा प्रश्न

Next

मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेखालील दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामाहून मुंबई महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (एमएमओपीएल) जुंपली असतानाच आता या कामाची जबाबदारी महापालिका आणि एमएमओपीएलकडे असल्याचे म्हणत एमएमआरडीएने आपले हात वर केले आहेत.
मेट्रोखालील दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची जबाबदारी या दोन्ही प्राधिकरणांची आहे, अशी उत्तरेच एमएमआरडीएने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांना दिली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भात माहिती मागविली होती. मेट्रोखालील रस्ते, फुटपाथ, नाले दुरुस्तीचे काम महानगरपालिकेचे असून, फ्लॉवर बेड सुशोभीकरणाचे काम एमएमओपीएलचे आहे, असे एमएमआरडीएने म्हटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेट्रोखाली असलेल्या पिलरमधील भागाचे सुशोभीकरण करण्यात आलेले नाही. परिणामी या कामाची जबाबदारी कोणाची, या प्रश्नावर हे काम मुंबई मेट्रो-१ प्रायव्हेट लिमिटेडने करायचे असल्याची माहिती कार्यकर्त्याला देण्यात आली.

Web Title: Metro question below

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.