मेट्रो रेल्वे भरतीच्या फसव्या जाहिराती!
By admin | Published: June 27, 2015 01:20 AM2015-06-27T01:20:12+5:302015-06-27T01:20:12+5:30
मेट्रोमध्ये नोकर भरती सुरू असल्याच्या फसव्या जाहिराती प्रसिद्ध होत असून, त्या जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये, असा इशारा मुंबई महानगर प्रदेश विकास
मुंबई : मेट्रोमध्ये नोकर भरती सुरू असल्याच्या फसव्या जाहिराती प्रसिद्ध होत असून, त्या जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये, असा इशारा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिला आहे. प्राधिकरणाने या संदर्भात वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस ठाणे, सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक दिलीप कवठकर यांनी याबाबत सांगितले, की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये प्रशासकीय पदांची भरती करण्यासाठी खोट्या व बनावट जाहिराती असामाजिक तत्त्वांद्वारे प्रसिद्ध होत आहेत. १८, २० आणि २२ जून २०१५ रोजी एमएमआरसीतर्फे प्राधिकरणाने विविध पदांच्या भरतीसाठी तीन जाहिराती वर्तमानपत्रांत जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीद्वांरे अर्ज करणाऱ्या खुल्या आणि ओबीसी अर्जदारांनी ४०० रुपये, एससी, एसटी आणि पीडब्लूडी अर्जदारांनी १०० रुपयांचा विनापरतावा आॅनलाइन भरावा, असे नमूद केले होते. ज्या अर्जदारांची कॉम्प्युटरबेस्ड असेसमेंट टेस्ट घेण्यात येणार आहे, अशाच अर्जदारांनी ही फी भरणे आवश्यक आहे. मात्र ज्या अर्जदारांनी कुठेलीही परीक्षा देणे आवश्यक नव्हते त्यांनी केवळ १०० रुपये विनापरतावा फी आॅनलाइन भरणे आवश्यक होते, असेही कवठकर यांनी सांगितले.