अधिसूचना निघाल्याने मेट्रोला गती

By admin | Published: September 14, 2014 01:08 AM2014-09-14T01:08:01+5:302014-09-14T01:08:01+5:30

शहर विकासाला गती देणाऱ्या व सोबतच शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मेट्रो रेल्वे ट्रॅकसंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने अधिसूचना जारी के ली आहे. यासोबतच मेट्रोच्या मार्गातील

Metro rolls down due to notification | अधिसूचना निघाल्याने मेट्रोला गती

अधिसूचना निघाल्याने मेट्रोला गती

Next

नासुप्र : ६ आॅक्टोबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारणार
नागपूर : शहर विकासाला गती देणाऱ्या व सोबतच शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मेट्रो रेल्वे ट्रॅकसंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने अधिसूचना जारी के ली आहे. यासोबतच मेट्रोच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
या अधिसूचनेवर नागरिकांकडून ६ आॅक्टोबरपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. सुमारे १०,५५० हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी ७७ हेक्टर जमिनीचे शासनाने अधिग्रहण केले आहे. पाच हेक्टर जमीन खासगी समूहाकडून घेण्यात येणार आहे. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) नागपूर मेट्रोचा ३८.१२ किलोमीटरचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. डीएमआरसीने नागपूरसाठी दोन कॉरिडोअर तयार केले आहेत. यात उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम यांचा समावेश आहे. शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पातील ३५ किलोमीटरचा टप्पा जमिनीवरून तर ४.५ कि.मी.चा ट्रॅक अंडग्राऊ ड राहणार आहे.३५ कि.मी.च्या कामासाठी २३० कोटी तर जमिनीखालील ट्रॅकसाठी ८० कोटी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आॅगस्ट महिन्यात या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाने अधिसूचना काढल्याने या प्रकल्पाला गती मिळाली आहे. (प्रतिनिधी)
असा आहे मेट्रो ट्रॅक
डीएमआरसीने प्रस्तावित केलेल्या ३५ किलोमीटरच्या मेट्रो ट्रॅक मार्गासाठी दोन क ॉरिडोअर्स निश्चित केले आहे. यात उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम यांचा समावेश आहे. दोन्ही क ॉरिडोअरमधून निघणाऱ्या मेट्रो सीताबर्डीतील मुंजे चौकात एकमेकांना क्रॉस करतील. येथे प्रवाशांना मेट्रो बदलता येईल.
उत्तर-दक्षिण क ॉरिडोअर : १९.६५. कि.मी लांबी, १८ स्टेशनचा समावेश
आॅटोमोटिव्ह चौक, नारी रोड, इंदोरा, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, कस्तुरचंद पार्क, झिरोमॉईल, सीताबर्डी, काँग्रेसनगर, रहाटे कॉलनी, अजनी चौक, छत्रपती चौक, जयप्रकाशनगर, उज्ज्वलनगर, विमानतळ व खापरी.
पूर्व-पश्चिम कॉरिडोअर : १८ कि.मी.लांबी व १९ रेल्वे स्टेशनचा समावेश
प्रजापतीनगर, वैष्णवदेवी चौक, आंबेडकरनगर चौक, टेलिफोन एक्स्चेंज चौक, चितारओळ चौक, अग्रसेन चौक, दोसर वैश्य चौक, रेल्वेस्टेशन, सीताबर्डी, झांशी राणी चौक, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स, शंकरनगर, एलएडी चौक, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, सुभाषनगर, रचना आपार्टमेंट, वासुदेवनगर, बन्सीनगर व लोकमान्यनगर

Web Title: Metro rolls down due to notification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.