मेट्रोला दुस:या दिवशीही लेटमार्क!

By admin | Published: June 10, 2014 01:46 AM2014-06-10T01:46:04+5:302014-06-10T01:46:04+5:30

रविवारच्या उद्घाटनानंतर पहिल्या फेरीतच तांत्रिक बिघाडामुळे विलंबाने धावलेली मेट्रो दुस:या दिवशीही (सोमवारी) विलंबाने धावली.

Metro on the second day! | मेट्रोला दुस:या दिवशीही लेटमार्क!

मेट्रोला दुस:या दिवशीही लेटमार्क!

Next
>मुंबई : रविवारच्या उद्घाटनानंतर पहिल्या फेरीतच तांत्रिक बिघाडामुळे विलंबाने धावलेली मेट्रो दुस:या दिवशीही (सोमवारी) विलंबाने धावली. घाटकोपरहून वर्सोव्याला जाण्यासाठी मेट्रोला एकवीस मिनिटांचा कालावधी लागत असतानाच प्रवाशांना घाटकोपरपासून डी.एन.नगर्पयतचे अंतर कापण्यातच अर्धा तास लागत होता.
मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या मेट्रो रेल्वेने पहिल्या दिवशी 23क् फे:या पूर्ण करत तब्बल दोन लाख प्रवासी वाहून नेले. मात्र पहिला दिवस हा मेट्रोच्या ‘राइड’चा साजरा झाल्याने या राणीने मुंबईकरांना अक्षरश: भुरळ घातली. परंतु सोमवार उजाडताच मेट्रो ‘राइड’ला येणा:या मुंबईकरांची संख्या काहीशी घटली. आणि मेट्रोच्या वाढलेल्या गर्दीत मुंबईचा चाकरमानी सामील झाला.
सोमवारी पहाटे साडेपाचच्या ठोक्याला मेट्रो रुळावर आली आणि हळूहळू तिने वेग पकडला. उत्तरोत्तर मेट्रोमधील चाकरमान्यांची गर्दी काहीशी वाढू लागली. मध्य रेल्वेहून दादर क्रॉस करत पश्चिम रेल्वेवरील अंधेरी रेल्वे स्थानक गाठण्याऐवजी मुंबईकर चाकरमान्यांनी घाटकोपरहून अंधेरीला मेट्रोने जाणो पसंत केले. शिवाय हाच कित्ता पश्चिम रेल्वेहून दादर क्रॉस करत घाटकोपर गाठणा:या प्रवाशांनी गिरवला.
दरम्यान, प्रत्यक्षात मेट्रोचा वेग हा ताशी ऐंशी ते नव्वद किमी आहे. मात्र सुरुवातील मेट्रो ताशी पन्नास किमीच्या वेगाने चालविण्यात येत आहे. शिवाय ट्रॅकदरम्यानच्याही काही दुरुस्त्यांच्या कारणास्तव मेट्रोचा ताशी वेग पन्नास किमी ठेवण्यात येत असल्याची माहिती सूत्रंनी दिली. परिणामी सोमवारी धावलेली मेट्रो कमी वेगाच्या अंतराने का होईना; आपला रस्ता कापत असल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)
 
च्वर्सोवा, अंधेरी, साकीनाका आणि घाटकोपर या मेट्रो रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. मुंबईकरांनी आपली वाहने जे.पी. रोड आणि एस.व्ही. रोड येथे उभी केली होती. मात्र येथे उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी झाली होती. त्याशिवाय मेट्रो रेल्वे स्थानकांखाली उभ्या केलेल्या रिक्षांमुळेदेखील वाहतूककोंडी झाली.

Web Title: Metro on the second day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.