मेट्रो प्रवासाची लवकरच स्वप्नपूर्ती!

By admin | Published: August 10, 2014 01:25 AM2014-08-10T01:25:41+5:302014-08-10T01:25:41+5:30

विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २१ आॅगस्टला भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे.

Metro travel dream dream soon! | मेट्रो प्रवासाची लवकरच स्वप्नपूर्ती!

मेट्रो प्रवासाची लवकरच स्वप्नपूर्ती!

Next

मेट्रोरेल : प्रकल्पाच्या भूमिपूजनासोबतच विकासालाही गती मिळणार
नागपूर : विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २१ आॅगस्टला भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे. सोबतच २५ लाख नागरिकांची मेट्रो रेल्वे प्रवासाची स्वप्नपूर्ती होणार असल्याने शहरासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.
वाढती लोकसंख्या व वाहनांची होणारी गर्दी यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. मेट्रोमुळे ही समस्या मार्गी लागणार आहे. नागपूर शहरातील दोन मेट्रो मार्गांना यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापती नगर ते लोकमान्यनगर असे दोन मेट्रोमार्ग आहेत. या मार्गांची एकूण लांबी ३८.२ किलोमीटर आहे. सहा वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुधारित प्रस्तावानुसार १०५२६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
दिल्ली मेट्रोरेल कार्पोरेशन कंपनी यांनी नागपूर मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या दोन्ही मार्गिकांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. नागपूर मेट्रोसाठी नागपूर मेट्रो कार्पोरेशन लिमिटेड नावाने एक स्पेशल पर्पज व्हेईकल(एसीव्ही)कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि.या कंपनीस या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातील अधिकार देण्यात येणार आहे. तसेच ही कंपनी स्थापन होईपर्यत नागपूर सुधार प्रन्यास या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन संस्था म्हणून काम पाहात आहे. या प्रकल्पात केंद्र शासनाचा २० व राज्य शासनाचा २० टक्के तर महापालिका व नासुप्रचा प्रत्येकी ५ टक्के सहभाग राहणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी कर्ज आणि इतर स्रोताव्दारे उभारला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Metro travel dream dream soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.