म्हाडा घरांची सोडत जाहीर
By Admin | Published: August 10, 2016 10:26 AM2016-08-10T10:26:10+5:302016-08-10T10:28:12+5:30
म्हाडाचे पहिले तीन सदनिका विजेता जाहीर करण्यात आले असून कलमेश चौहान, वर्षा माने आणि नीलेश सबरदांडे विजेता ठरले आहेत
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 10 - मुंबईत आपलं घर असावं या हेतूने म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेले अर्जदार वाट पाहत असलेली सोडत जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. म्हाडाच्या 972 घरांची सोडत जाहीर होत आहे. म्हाडाचे पहिले तीन सदनिका विजेता जाहीर करण्यात आले असून कलमेश चौहान, वर्षा माने आणि नीलेश सबरदांडे विजेता ठरले आहेत. तर अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांनाही बोरिवलीच्या मागाठाणे परिसरात घर लागलं आहे.
972 घरांसाठी तब्बल 1 लाख 35 हजार अर्ज म्हाडाकडे आले आहेत. वांद्रा पश्चिम इथल्या रंगशारदा हॉलमध्ये सकाळी 9 वाजता घरांची सोडत सुरु करण्यात आली आहे. बोरीवली, दहीसर, गोरेगाव, मालाड, मानखुर्द, चेंबूर, कुर्ला आणि पवई येथील घरांसाठी ही लॉटरी आहे.
म्हाडाच्या सोडतीत पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील घरे आहेत. उच्च उत्पन्न गटातील सर्वात महागडी घरे दहिसरमधील शैलेंद्र नगर येथे आहेत. त्यांची किंमत ८३ लाख ८६ हजार एवढी आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वात स्वस्त घरे मालाड-मालवणी येथे असून, त्या घरांची किंमत ८ लाख १७ हजार एवढी आहे.