खूशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी लवकरच; 7,500 जणांचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 02:42 PM2021-02-10T14:42:26+5:302021-02-10T14:54:50+5:30

MHADA Lottery 7500 houses : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे अशी माहिती गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

mhada lottery 7500 houses in kokan thane and new mumbai | खूशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी लवकरच; 7,500 जणांचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण 

खूशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी लवकरच; 7,500 जणांचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण 

Next

मुंबई - मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वत:चं घर घेणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण लवकरच म्हाडाच्या घरांची लॉटरी असून 7 हजार 500 जणांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्याकोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे अशी माहिती गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडाकडे जमीन नाही. विकासकांसोबत संयुक्त भागीदार करून घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी म्हटलं आहे.

म्हाडा पत्रकार संघाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्ताने म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले,  जमीन अधिग्रहण आणि गृहसाठा यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. भागीदारीत गृहसाठा आणि भूखंड अधिग्रहणातून घरे उपलब्ध केली जातील.  म्हाडातील कार्यप्रणाली सुलभ करण्याच्या प्रयत्नास  यश आलेले नाही, ही खंतदेखील आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. या सोडतीतील घरं ही ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील आहेत. कोकण मंडळाची सोडत ही लॉकडाऊनमुळे थोडी लांबणीवर गेली होती. मात्र आता तयारी सुरू झाली आहे. 

म्हाडाच्या 'या' बंपर लॉटरीत कुठे आणि किती असतील घरं?

घरांचं ठिकाण - वर्तकनगर, ठाणे - एकूण घरं - 67

घरांचं ठिकाण -  ठाणे शहर - विखुरलेली एकूण घरं - 821

घरांचं ठिकाण - घणसोली, नवी मुंबई - एकूण घरं - 40

घरांचं ठिकाण - भंडार्ली, ठाणे-ग्रामीण - एकूण घरं - 1771

घरांचं ठिकाण - गोठेघर - ठाणे ग्रामीण - एकूण घरं - 1185

घरांचं ठिकाण - खोणी-कल्याण ग्रामीण - एकूण घरं - 2016

घरांचं ठिकाण - वाळीव-वसई - एकूण घरं - 43

कोकण बोर्डाचे मुख्याधिकारी नितीन महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार घरांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्यात याची लॉटरी काढली जाईल आणि विजेत्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल.


 

Read in English

Web Title: mhada lottery 7500 houses in kokan thane and new mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.