म्हाडा हस्तांतरण शुल्कात वाढ?

By admin | Published: August 13, 2014 03:19 AM2014-08-13T03:19:26+5:302014-08-13T03:19:26+5:30

म्हाडाची पंतप्रधान अनुदान निवास व विक्री योजनेतील गाळ्यांच्या हस्तांतरणाबाबत लागू केलेली तिप्पट शुल्कवाढ आता अन्य योजनेतील घरांसाठी आकारण्यात येणार आहे

MHADA transfer charges increase? | म्हाडा हस्तांतरण शुल्कात वाढ?

म्हाडा हस्तांतरण शुल्कात वाढ?

Next

मुंबई : म्हाडाची पंतप्रधान अनुदान निवास व विक्री योजनेतील गाळ्यांच्या हस्तांतरणाबाबत लागू केलेली तिप्पट शुल्कवाढ आता अन्य योजनेतील घरांसाठी आकारण्यात येणार आहे. मुंबई मंडळाने त्याबाबतचा प्रस्ताव बनविलेला असून, येत्या प्राधिकरणाच्या बैठकीपुढे मांडण्यात येणार आहे.
म्हाडाकडून विविध योजनेंतर्गत घर घेतलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील गाळ्यासाठी साडेसात हजार शुल्कावरून २५ हजार भरावे लागणार आहेत. तर अल्प व मध्यम गटासाठी अनुक्रमे ५० हजार व १ लाख भरावे लागतील. उच्च उत्पन्न गटासाठीचे शुल्क ३५ हजारांवरून
२ लाख केले आहे.
वाल्मीकी आवास व अन्य योजनांमध्ये हे हस्तांतरण शुल्क लागू केले जाईल.
मुंबई मंडळाने प्राधिकरणाच्या परवानगीविना २१ मेपासून परस्पर शुल्कवाढ लागू केल्याबद्दल सभापती युसूफ अब्राहनी यांनी आक्षेप घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात प्राधिकरणाकडून त्याबाबत रीतसर मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पुढची बैठक २१ आॅगस्टला होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुंबई मंडळातील विक्री योजनेतील सदनिका, दुकानगाळे आणि पंतप्रधान अनुदान प्रकल्प योजनेतील गाळ्यांचे विनापरवाना हस्तांतरण, नियमितीकरण झाल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्याला पायबंद बसण्यासाठी म्हाडाने ‘मित्र’ योजना राबविली असून, त्यामध्ये म्हाडा विनियम १९८१मधील विनियम २४ व २५ या हस्तांतरणासंबंधी तरतुदीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MHADA transfer charges increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.