खुशखबर...! म्हाडा काढणार ८४९ घरांची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:20 PM2023-02-08T12:20:06+5:302023-02-08T12:22:03+5:30
९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ पासून सोडतीसाठी ऑनलाइन अनामत रकमेच्या स्वीकृतीस प्रारंभ होईल. ११ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येईल.
मुंबई : म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबादमधील ८४९ सदनिका व ८७ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ झाला. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ पासून सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येणार असून, १० मार्चच्या रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ पासून सोडतीसाठी ऑनलाइन अनामत रकमेच्या स्वीकृतीस प्रारंभ होईल. ११ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येईल. १३ मार्च रोजी बँकेच्या वेळेपर्यंत अनामत रकमेचा भरणा करता येईल. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर होईल.