जोशींच्या बदलीने माफिया, आमदारांचा सुटकेचा नि:श्वास

By admin | Published: April 29, 2016 03:58 AM2016-04-29T03:58:59+5:302016-04-29T03:58:59+5:30

आमदार गणपत गायकवाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने चंग बांधल्याने अखेर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली झाली आहे.

Mhfia, breathing freedom of MLAs, transfer of Joshi | जोशींच्या बदलीने माफिया, आमदारांचा सुटकेचा नि:श्वास

जोशींच्या बदलीने माफिया, आमदारांचा सुटकेचा नि:श्वास

Next

ठाणे : रेती-खाण माफिया, बेकायदा गोदाम मालकांची लॉबी यांच्या डोळ्यात सलत असलेल्या आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने चंग बांधल्याने अखेर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली झाली आहे. जोशी यांच्या बदलीमुळे स्वच्छ प्रशासनाचे वायदे करणाऱ्या राज्यातील भाजपाप्रणीत सरकारचेच नाक कापले गेल्याची भावना ठाणेकरांमध्ये व्यक्त होत आहे.
जिल्ह्याला तब्बल ३१ वर्षांनंतर डॉ. अश्विनी जोशी यांच्या माध्यमातून महिला जिल्हाधिकारी लाभल्या होत्या. शिवाय त्या आयएएस दर्जाच्या अधिकारी होत्या. अन्यथा ठाण्यात प्रमोटी आयएएस जिल्हाधिकारीपदी धाडण्याची जुनी प्रथा होती.
जोशी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मात्र वेगवेगळ््या लॉबींनी आणि त्यांना आशीर्वाद असलेल्या स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींनी बदलीकरिता रेटा लावल्याने अखेर मुंबईचे जिल्हाधिकारी हे तोलामोलाचे पद देऊन त्यांची घाऊक बदल्यांमध्ये उचलबांगडी केली गेली.
भाईंदरमधील सेंट्रल पार्क चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. ती जागा सरकारी असल्याचे उघडकीस आल्यावर जिल्हाधिकारी जोशी यांनी याबाबत नोटीस बजावल्या. तसेच पार्कच्या कामाला स्थगिती दिली. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणावरून त्यांना लक्ष्य केले होते. करमणूक कर भरण्याच्या प्रकरणावरून कल्याणचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड आणि जिल्हाधिकारी यांच्यात कलगीतुरा रंगला. तेही सध्या भाजपाच्या कळपात आहेत. ठाणे, कल्याण, भाईंदर रेतीबंदर परिसरातील अवैध रेती उपासा करणाऱ्या माफियांविरोधातही जोशींनी कारवाई केली होती. नवी मुंबईतील दगड खाणी सील करण्याची कारवाई यापूर्वी केली. जोशी यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत वनराई बंधारे उभारले. तसेच टाऊन हॉलला नवीन झळाळी प्राप्त करून दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Mhfia, breathing freedom of MLAs, transfer of Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.