एमएचटी सीईटीच्या तारखा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 02:49 AM2020-05-20T02:49:26+5:302020-05-20T02:49:52+5:30
जुलै महिन्याच्या ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० व ३१ या तारखांना एमएचटीसीईटी होईल. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार नाहीत, त्यांना ३, ४ आणि ५ आॅगस्टला पुन्हा परीक्षेची संधी मिळेल.
मुंबई : ‘बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी घेतली जाणारी एमएचटी सीईटी जुलैमध्ये घेतली जाणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. त्यानंतर सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी यासंदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. सोबतच प्रमुख व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे अर्ज भरण्यास ही ३० मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
जुलै महिन्याच्या ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० व ३१ या तारखांना एमएचटीसीईटी होईल. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार नाहीत, त्यांना ३, ४ आणि ५ आॅगस्टला पुन्हा परीक्षेची संधी मिळेल.
मार्च महिन्यातील सीईटी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तब्ब्ल ५ लाख २४ हजार ९०७ अर्ज आले होते. त्यानंतर आता पुन्हा अर्ज भरण्याची लिंक ओपन केल्यानंतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत वाढ होणार असल्याची माहिती सीईटीचे सुभाष महाजन यांनी दिली. त्याशिवाय, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाची जहाजे व विमानेही मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
दोन्ही गटांच्या परीक्षा होणार वेगळ्या
सीईटीच्या नियमांप्रमाणे पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांच्या परीक्षा वेगळ्या होतील. परीक्षा ज्या केंद्रावर होतील त्या केंद्रांच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर जूनच्या मध्यापर्यंत परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.